काही वेळा आपल्यापैकी काही जण डेटा नष्ट होण्याच्या परिस्थितीतून नक्कीच गेले असतील. आपला डेटा नष्ट होण्याची अनेक कारणे आहेत, जसे चुकून डेटा डिलीट करणे, व्हायरस, damaged, corrupted किंवा inaccessible डेटा स्टोरेज. हा डेटा डेस्कटॉप, लॅपटॉप किंवा external storage वरील असू शकतो.
या लेखात डेटा नष्ट होण्याच्या सामान्य घटनांचे वर्णन आहे आणि डेटा पुन्हा मिळू शकतो किंवा नाही याविषयी दृष्टीकोन मांडलेला आहे.
*Data Recovery:*
साध्या संज्ञे मध्ये, data recovery ही नष्ट झालेला डाटा परत मिळविण्याची प्रक्रिया आहे. डाटा नष्ट होण्याच्या परिस्थितीवर data recovery ची प्रक्रिया अवलंबून आहे.
आता येथे त्यांची माहिती घेऊ या
*Accidentally delete of File or folder:*
जेव्हा तुम्ही एखादी फाईल डिलीट करता, तेव्हा या फाईल ड्राईव्ह मधून ताबडतोब काढून टाकल्या जात नाहीत, तर त्यांना डिलीटेड म्हणून खूण लावली जाते आणि जोपर्यंत त्यावर दुसरी फाईल पुनर्लिखीत केली जात नाही तोपर्यंत त्या फाईल ड्राईव्ह मध्येच राहतात. या मधल्या वेळेत आपण डिलीट केलेल्या फाईल विस्कळीत fragments च्या स्वरुपात राहतात, आणि त्यांना आपण परत मिळवू शकतो.
या परिस्थितीत चांगल्या data recovery सॉफ्टवेअरचा वापर करुन हा नष्ट झालेला डेटा परत मिळवता येतो. पण हि प्रक्रिया जेव्हा डेटा नष्ट होतो, तेव्हा लगेच करावी लागते. हे सॉफ्टवेअर संपूर्ण हार्ड ड्राईव्हची तपासणी करतात आणि Master File Table(MFT) मधील डिलीट झालेल्या नोंदी शोधतात. नंतर या ठरावीक डिलीट झालेल्या नोंदींसाठी clusters निवडतात आणि या clusters मधील सामुग्री नविन ठिकाणी कॉपी करतात.
फाईल सिस्टीमवर नष्ट झालेला डाटा परत मिळण्याची शक्यता अवलंबून असते. विंडोज साठी NTFS फाईल सिस्टीम मध्ये डाटा परत मिळण्याची शक्यता जास्त असते तर FAT सिस्टीम मध्ये साधारण शक्यता असते. तुमच्या कॉम्युटरमध्ये कोणती फाईल सिस्टीम वापरली जात आहे याविषयी तुम्हाला data recovery सॉफ्टवेअर वापरत असतांना माहिती असली पाहिजे.
*Damage File system format:*
फाईल सिस्टीम हि डाटा च्या संरचनेची पद्धत आहे, ज्याचा वापर ऑपरेटींग सिस्टीमकडून डिस्क किंवा पार्टीशियन वरील फाईलचा मागोवा घ्येण्यासाठी होतो. तो व्हायरस किंवा चुकीच्या सुचनांनी बिघडू शकतो. जर तुम्ही ड्राईव्ह फॉरमॅट केला तर तो या जुन्यावरतीच एक नविन कोरे file system structures तयार करतो.
परिणामकारक Data recovery सॉफ्टवेअर हे खराब पार्टीशियन मधील crashed file system ची पुर्नरचना करु शकतात. पण हे सर्व किती allocation ची माहिती शिल्लक आहे आणि डाटा किती खराब झालेला आहे यावर अवलंबून असते. काही वेळा डाटा परत मिळण्याची शक्यता जास्त असते जेव्हा फाईल सिस्टीम हि त्याच फाईल सिस्टीमने फॉरमॅट केलेली असेल.
*Corrupt partitions:*
काही वेळा हार्ड डिस्कवरील डेटा हा पार्टीशियन खराब झाल्यामुळे वाचण्यायोग्य नसतो. हे एका फाईल सिस्टीम मधून दुस-या फाईल सिस्टीम मध्ये बदलवून घेतांना घडते, व्हायरसमुळे किंवा नविन पार्टीशियन तयार करतांना ति-हाइत सॉफ्टवेअर वापरल्यामुळे घडू शकते.
ब-याचश्या वेळा recovery सॉफ्टवेअर चा उपयोग करुन डिलीट झालेल्या किंवा खराब झालेल्या logical drives मधील डेटा परत मिळविण्याची शक्यता असते.
*Overwritten data:*
जेव्हा डेटा आधिच्या डेटावर पुनर्लिखीत केला जातो तेव्हा तुम्ही आधीचा डेटा गमावून बसता.
दुर्दैवाने असा डेटा परत मिळविण्याची शक्यता नसते, जरी डाटा फक्त एकदाच पुनर्लिखीत केला असेल तरी.
*Physical damage:*
हार्ड डिस्क खराब होण्यामागे अनेक कारणे आहेत जसे hardware overheating, power surges, moisture इ.
अश्या वेळी तुम्हाला data recovery तज्ञांकडे हार्ड डिस्क घेऊन जावी लागते. घरच्या घरी आपण हार्ड दुरुस्त करु शकत नाही.
किरण पाटील