या ब्लॉगवरील सर्व माहिती इन्टरनेट आणि तंत्रस्नेही शिक्षकांच्या मदतीने संकलित करण्यात आली आहे .......

माझी शाळा

‘माझी शाळा’* ही दूरदर्शन – सह्याद्री वाहिनीसाठी निर्मित ४० भागांची मालिका आहे, जी दर रविवारी सकाळी ९.३० वा. दाखवली जात होती आणि त्याच भागाचं पुन:प्रसारण पुढच्या शनिवारी रात्री ९ वाजता होते.

*'माझी शाळा'* या मालिकेचे सर्व चाळीस भाग कथानकाच्या स्वरूपाचे आहेत.

ज्ञानसंरचनावाद या संकल्पनेवर रचलेले आणि शाळा, शिक्षण, शिक्षक, विद्यार्थी, पालक, स्वच्छता, विज्ञान, इतिहास, भूगोल, भाषा, संगणक, पर्यावरण, गणित या विषयांशी संबंधित तत्त्वं गोष्टींच्या स्वरूपात मांडली जातील. सर्व कथा सुमित्रा भावे यांनी लिहिल्या आहेत आणि मालिकेचं शीर्षक गीत आणि इतर गीते सुनील सुकथनकरांनी रचली आहेत.
दिग्दर्शन सुमित्रा भावे – सुनील सुकथनकर यांचं आहे. मालिकेच्या विविध भागांचे चित्रीकरण महाराष्ट्राच्या वेगवेगळया भागात करण्यात आले, ज्यामुळे महाराष्ट्राची भौगोलिक आणि सामाजिक विविधता दिसते.

एका ‘मुक्त शिक्षण संशोधन केंद्रात’ शिक्षणावर सहभागी पद्धतीनं संशोधन करणारे चार शिक्षक आणि त्यांचे प्रकल्प प्रमुख, या एका धाग्यानं सर्व भाग बांधले आहेत. या पाच पात्रांमध्ये घडणार्‍या चर्चेमुळे शिक्षणातील तात्त्विक मुद्दे पुढे येतात आणि त्यावर अधिक चर्चा घडवून आणली जाते.

काही वेळा घडणारी कथा हा त्यांचा स्वतःचा अनुभव असेल किंवा त्यांनी ऐकलेली, वाचलेली घटना जिच्या माध्यमातून ज्ञानसंरचनावाद समजून घेता येईल.

दूरदर्शन (सह्याद्री) हे खेडोपाडी पोचलेलं माध्यम आहे. त्यामुळे गावोगावी, निमशहरी भागात आणि शहरातदेखील काम करणारे शिक्षक, शालेय विद्यार्थी, त्यांचे पालक, शिक्षणक्षेत्रात काम करणार्‍या संस्था, प्रसारमाध्यमं, सामाजिक संस्था यांनादेखील या मालिकेचा आपापल्या कामात उपयोग करून घेता येईल.

आजच्या शिक्षणपद्धतीत बदल घडावेत म्हणून अनेक लोक विविध पातळ्यांवर झटत आहेत. अनेक संस्था, व्यक्ती तळागाळातील लोकांच्या शिक्षणाचे हक्क, धोरणात्मक बदल, कायदे, शासन यंत्रणेत परिवर्तन, शासन यंत्रणेबाहेर शिक्षणाचे प्रयोग करत आपल्या देशात परिवर्तन घडवण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

एमकेसीएल आणि विचित्र निर्मितीतर्फे ही मालिका बनवण्यामागची भूमिका याच बदलाच्या प्रक्रीयेमध्ये शामिल होण्याची आहे.

या मालिकेचे सर्व भाग आपन पाहू शकता आपल्या ब्लॉगवर.......


 भाग १ 

भाग २

भाग ३

भाग ४

भाग ५

भाग ६

भाग ७

भाग ८

भाग ९

भाग १०

भाग ११

भाग १२

भाग १३

भाग १४

भाग १५

भाग १६

भाग १७

भाग १८

भाग १९

भाग २०

भाग २१

भाग २२

भाग २३

भाग २४

भाग २५ 

भाग २६ 

भाग २७ 

भाग २८ 

भाग २९ 

भाग ३० 

भाग ३१ 

भाग ३२ 

भाग ३३ 

भाग ३४ 

भाग ३५ 

भाग ३६ 

भाग ३७ 

भाग ३८ 

भाग ३९ 

भाग ४०