या ब्लॉगवरील सर्व माहिती इन्टरनेट आणि तंत्रस्नेही शिक्षकांच्या मदतीने संकलित करण्यात आली आहे .......

Saturday, August 6, 2016

वीज कोसळण्याची माहिती देणार ‘अ‍ॅप्स’

अमेरिकेत वीज कोसळण्यापूर्वी माहिती देणारे ‘अ‍ॅप्स’ तयार झाले आहे.
पावसाळ्याच्या काळात गडगडाट होऊन वीज कोसळण्याची भीती सर्वाधिक असते. प्रचंड ऊर्जा असलेली ही वीज कोसळताच जीवित व वित्तहानी मोठया प्रमाणात होते. ही वीज कधी कोसळणार याची माहिती कोणालाही सांगता येत नाही. त्यामुळे अनेकांना आपले बहुमोल प्राण गमवावे लागतात. अमेरिकेत वीज कोसळण्यापूर्वी माहिती देणारे ‘अ‍ॅप्स’ तयार झाले आहे. या नवीन शोधामुळे विजेपासून अनेकांना जीव वाचवता येणे शक्य आहे.
‘वेदरबग’ कंपनीने हे अ‍ॅप्स बनवले असून त्याचे नामकरण ‘स्पार्क’ असे करण्यात आले आहे. तुमच्या परिसरात वीज कोसळणार असल्यास त्याची माहिती तात्काळ मोबाइलवर ग्राहकांना मिळू शकेल. यासाठी कंपनीने ‘टोटल लायटनिंग नेटवर्क्‍स’ कंपनीकडून माहिती पुरवण्याचा करार केला आहे. वीज पडल्यास त्यापासून सुरक्षित जागेची माहिती दिली जाणार आहे, अशी माहिती ‘अवरअ‍ॅमेझिंगप्लॅनेट’ या संकेतस्थळाने दिली.
मोबाइलमध्ये रडार नकाशा झूम केल्यानंतर तुम्ही उभे असलेल्या स्थानाची माहिती द्यावी, त्यानंतर तुम्हाला तात्काळ वीज कुठे पडणार याची माहिती मिळू शकेल. तसेच हवामानाची विशेष माहिती पुरवली जाईल, असे सूत्रांनी सांगितले.