या ब्लॉगवरील सर्व माहिती इन्टरनेट आणि तंत्रस्नेही शिक्षकांच्या मदतीने संकलित करण्यात आली आहे .......

Friday, September 11, 2020

तुमच्या जुन्या स्मार्टफोनला अशाप्रकारे बनवा सिक्युरिटी कॅमेरा!

How to turn your android smartphone as a webcam | तुमच्या जुन्या स्मार्टफोनला अशाप्रकारे बनवा सिक्युरिटी कॅमेरा!

 आजच्या जगात अपटेडेट टेक्नॉलॉजीमुळे सगळंकाही शक्य आहे. तुम्ही तुमच्या स्मार्टफोनचा वापर केवळ कॉलिंगसाठी नाहीतर कॅमेरा स्कॅनिंगसारख्या आणखीही अनेक कामांसाठी करु शकता. इतकेच काय तर तुमच्याकडे जर एखादा जुना वापरात नसलेला फोन असेल तर तुम्ही त्याचा वापर घराच्या सुरक्षेसाठीही करु शकता. 
एका स्मार्टफोनच्या माध्यमातून जगातल्या कोणत्याही कोपऱ्यातून तुम्ही घर आणि ऑफिसवर लक्ष ठेवू शकता. आम्ही अशाच एका अॅपबाबत तुम्हाला सांगणार आहोत ज्याच्या माध्यमातून तुम्ही स्मार्टफोनचा वापर सिक्युरिटी कॅमेरासारखा करु शकता. त्यासाठी तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनमध्ये  IP Webcam हे अॅप डाऊनलोड करावं लागेल.
IP Webcam अॅप कसं करेल काम ?
1)  IP Webcam अॅप आधी गुगल प्ले स्टोरवरुन डाऊनलोड करा. अॅप ओपन करण्याआधी फोनच्या सेटिंगमध्ये जा. त्यात तुम्हाला सगळे अॅप दिसतील. त्यानंतर तुमच्या फोनमध्ये जितकेही कॅमेरा अॅप आहेत ते फोर्स स्टॉप करा. नंतर  IP Webcam अॅप ओपन करा. 
2) ते ओपन केल्यावर प्लग-इनचा पर्याय सेलेक्ट करुन त्यावर टॅप करा. त्यात देण्यात आलेले सगळे फिचर्स इन्स्टॉल करा. फिचर्स इन्स्टॉल केल्यानंतर सर्वच फिचर्स ऑन करा. यातील एकही फिचर ऑफ राहिल्यास हे अॅप काम करणार नाही. 
3) आता अॅपमध्ये जाऊन खाली देण्यात आलेल्या start server पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर ओपन होणाऱ्या विंडोला yes करा. 
4) विंडोमध्ये Webcam चा IP अॅड्रेस येईल. तो कॉपी करुन त्या फोन किंवा PC मध्ये टाका ज्यावर लाईव्ह व्हिडीओ बघायचा आहे.
5) त्या ब्राऊजरवर IP अॅड्रेस टाकून एंटर करा. त्यानंतर एक विंडो ओपन होईल. त्या ब्राऊजरवर टॅप करा तुम्हाला लाईव्ह व्हिडीओ दिसायला लागेल.

Thursday, May 28, 2020

समजून घ्या सहजपणे : इमेल खरा की फसवणूक करणारा, कसं ओळखाल?



पुशान महापात्रा
सध्या विनाशकारी विषाणूचा उद्रेक झाला असताना संशय येणार नाही अशा पद्धतीने भुरळ पडून वापरकर्त्यांना लिंकवर क्लिक करण्यासाठी आणि अटॅचमेंट उघडण्यासाठी इमेल व संदेशाद्वारे आमंत्रण देऊन घबराट निर्माण करणे सायबर गुन्हेगारांकरिता सोयीचे झाले आहे. अशाप्रकारचे सायबर- हल्ले/ फसवणूक टाळायची असल्यास जागरुकता आणि सावधगिरी सर्वात जास्त आवश्यक आहे. सध्या सायबर गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. विविध प्रकारचे मेल पाठवून तुमची फसवणूक होई शकते. त्यामुळे सहज समजून घेऊयात खरा आणि फसवणूक करणाऱ्या इमेलबद्दल

  • इमेल पाठविणाऱ्या व्यक्तीचा इमेल अॅड्रेस त्याच्या नावाहून निराळा आहे का हे तपासून पहा : तुम्हाला शंका आल्यास इमेल अॅड्रेस तपासा किंवा इमेलमध्ये नमूद मजकूर तुम्हाला शीघ्र कृती करण्यासाठी भाग पाडतो का ते पहावे
  • इमेलला अटॅचमेंट आहे का आणि अधिक माहितीकरिता फाईल डाऊनलोड करण्याची विनंती केली आहे का हे तपासावे : लोकांना फसवण्यासाठी, फाईल डाऊनलोड करावी म्हणून मजकूर तयार केला जातो. ही पद्धत हमखास वापरली जाते. त्यामुळे अशा लिंक्स टाळा.
  • इमेलमध्ये अनोळखी युआरएल नाही याची खातरजमा कर : तुमची संवेदनशील खासगी माहिती मिळविण्याच्या उद्देशाने हॅकर्स अस्सल साईटचा बनावट नमुना तयार करतात. या खोट्या युआरएल इतक्या अस्सल वाटतात की, त्यांच्यातील फरक ओळखणे कठीण असते.कोणत्याही युआरएलवर क्लिक करण्यापूर्वी तपासून घ्या.
  • मेलमधील भाषा व्यावसायिक नसणे किंवा व्याकरणाची अशुद्धता तपासून घ्या : साधारणपणे, व्यावसायिक मेल हे भाषेतील जाणत्या कंटेंट रायटरकडून लिहून घेतलेले असतात. त्यामुळे त्यात व्याकरणाच्या चुका नसतात. जर तुम्हाला स्पेलिंग, विरामचिन्हे आणि भाषिक चुका आढळल्यास त्या बिनअनुभवी घोटाळेबाज किंवा फसवणूक करणाऱ्याने केल्याचे समजावे.
  • ते कोणती खासगी माहिती विचारत आहेत का ते तपासा :संघटना कशीही ग्राहकाची वैयक्तिक माहिती सहजपणे इमेलवर किंवा बँकेच्या क्रेडीट/डेबिट कार्डची माहिती मेसजवर विचारत नाही. त्यामुळे अशाप्रकारचे मेल किंवा मेसेज धोक्याचा इशारा समजावेत.
  • त्यांनी डेडलाईन नमूद केली आहे का ते तपासा : तुम्हालाहॅकर पॉलिसी नूतनीकरणाविषयी इमेल पाठवू शकतो किंवा खरेदीवर मर्यादित कालावधीकरिता सूट मिळत असल्याचे गाजर दाखवू शकतो. अशाप्रकारच्या इमेलकडे दुर्लक्ष करावे.
स्वत:ला फसवणुकीपासून दूर ठेवण्यासाठी अवलंबता येतील अशा काही सर्वोत्तम पद्धती:
  • लिंक खरी आहे का ते पडताळण्याकरिता माऊस लिंकवर फिरवा. संशय आल्यास क्लिक करू नका
  • वैयक्तिक/ संवेदनशील माहितीची विचारणा करणाऱ्या कोणत्याही इमेलला प्रतिसाद देऊ नका
  • पॉलिसी नूतनीकरण/प्रीमियम भरणा याकरिता आलेल्या कोणत्याही संशयित/ फिशिंग इमेलबाबत सावधगिरी राखा
  • प्रख्यात आरोग्य संघटना जसे की डब्ल्यूएचओकडून आलेल्या इमेलपासून सावध रहा. ताज्या सल्ल्यासाठी अधिकृत वेबसाईटला भेट दया
  • इशारा/धमकी देणारा मेल आल्यास घाबरून जाऊ नका. काळजीपूर्वक वाचा आणि कृती करा.
  • वेगवेगळ्या साईटकरिता निराळे पासवर्ड वापरा
  • विशेष फाईल आणि डेटा एनक्रप्ट करा
  • पॉप-अप्समध्ये वैयक्तिक माहिती देऊ नका
  • अनपेक्षित अटॅचमेंट उघडू नका
  • तुमची सिस्टीम पॅचेस आणि अँटी व्हायरसने अपडेट ठेवा
(लेखक एमडी आणि सीईओ, एसबीआय जनरल इन्श्युरन्स आहेत )

Sunday, May 24, 2020

GOOGLE MEET कसे वापरावे.......





गुगल सध्याच्या काळात व्हिडियो कॉन्फरन्स ची वाढती मागणी लक्षात घेता आपली गुगल मीट ही सेवा मोफत उपलब्ध करून दिली आहे.
बिजनेस मिटिंग करीता प्रसिध्द असलेल्या या  सेवेकरिता आधी  पैसे मोजावे लागत होते. zoom सारख्या app  च्या वाढत्या लोकप्रियतेनंतर  गुगलने उपलब्ध करून दिलेली हि सेवा म्हणजे zoom ला सुरक्षित आणि सोपा असा पर्याय आहे.

GOOGLE MEET  कसे वापरावे

व्हिडियो पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

 pdf  फाईल डाऊनलोड करण्यासाठी इथे  क्लिक करा.




Tuesday, March 3, 2020

ITR (इन्कम टॅक्स रिटर्न) इ-व्हेरिफिकेशन कसं करायचं ?

ITR (इन्कम टॅक्स रिटर्न) इ-व्हेरिफिकेशन कसं करायचं ?

३१ जुलै जवळ येताच करदात्यांची लगबग सुरु असते ती ITR (Income Tax Return) भरण्याची (नवीन अंतिम तारीख 31 ऑगस्ट). परंतु  ITR भरल्यानंतर जर  तुम्ही व्हेरिफाय नाही केला तर तुम्हाला पुन्हा नव्याने भरावा लागतो. ITR व्हेरिफाय करण्याचे दोन मार्ग आहेत एक म्हणजे ITR-V (ITR Verification form) जो तुम्हाला प्रिंट काढून पोस्ट करावा लागतो आणि दुसरा व सर्वात सोपा मार्ग म्हणजेच E – Verification ज्याद्वारे आपण अगदी काही मिनिटातच ITR e-verify करू शकता.
हे करण्यासाठी आपल्याकडे ३ पर्याय आहे .

चित्रात दाखविल्याप्रमाणे
Option 1 – जर आपणाकडे Electronic Verification Code असेल तर तिथे क्लिक करून आपण तो टाकू शकता.
Option 2 – जर आपणाकडे EVC नसेल तर आपण तो पुन्हा मागवून टाकू शकता. त्यासाठी खालील पर्याय वापरू शकता
2.1 – नेट बँकिंग द्वारे
2.2 – dmat अकाउंट असेल तर त्याद्वारे
2.3 – बँक अकाऊंट डिटेल्स द्वारे तसेच काही बँक ATM वापरून सुद्धा e-verify  करण्यासाठी पर्याय देतात.
Option 3 –  Aadhar OTP द्वारे व्हेरिफिकेशन करणे.
प्रथम Income Tax Department च्या www.incometaxindiaefiling.gov.in/home वेबसाइट वर जा किंवा डायरेक्ट लॉगिन पेजवर जाण्यासाठी येथे क्लिक करा
त्यानंतर User ID (जो तुमचा पॅन नंबर असेल ) आणि पासवर्ड टाका. जर आपणास पासवर्ड लक्षात नसेल तर Forgot Password वर क्लिक करा आणि पॅन नंबर टाकून Request OTP निवडा किंवा Continue करून Using OTP निवडा आणि आपल्या मोबाईल क्रमांक आणि ई-मेलवर आलेला OTP  टाकून पुढे जा आणि नवा पासवर्ड टाका.
लॉगिन केल्यानंतर View Returns/Forms वर क्लिक करा त्यानंतर  वरीलप्रमाणे Income Tax Return सिलेक्ट करा व पुढे जा त्यानंतर Click here to view your returns pending for e verification वर क्लिक करा त्यानंतर आपणास आपण भरलेले रिटर्न्स दिसतील आणि लाल रंगात e-verify म्हणून लिहिलेलं दिसेल. तिथे क्लिक करून पुढे जा.
आधार OTP  द्वारे e-verify करण्यासाठी वरील प्रमाणे Option 3 वर क्लिक करून पुढे जा. या नंतर तुम्हाला वरीलप्रमाणे दिसेल…तिथे आपल्या आधार सोबत रजिस्टर केलेल्या क्रमांकावर आलेला OTP  टाकून Submit बटनावर क्लिक करा.
यानंतर तुम्हाला E-Verification Successful असे दिसेल तसेच आपल्या ई-मेल वर पावती सुद्धा येईल.
सूचना – सर्व्हरवर लोड आल्यावर तुम्हाला UIDAI कडून OTP येण्यास विलंब होत असेल तर कृपया थोड्या वेळाने किंवा सकाळी/संध्याकाळी प्रयत्न करा.