माझ्या आधिच्या ट्रिक मध्ये विंडोज मधील फोल्डरला पासवर्ड कसा सेट करावा व फोल्डर कसे लपवावे हे सांगितलेच आहे.. कॉम्प्युटर मध्ये मजकूर लपविण्याचे अनेक मार्ग आहेत. पण तुम्ही तुमचा डाटा सुरक्षीत ठेवण्यासाठी कॉम्प्युटर मधील संपुर्ण ड्राईव्ह लपवू शकता याविषयी तुम्हाला माहिती आहे का? या आश्चर्यकारक ट्रिक मध्ये तुम्ही तुमच्या कॉम्प्युटर मधील हवा तो ड्राईव्ह हवा तेव्हा लपवू शकता. हि ट्रिक विंडोजच्या Windows Vista, Win 7 आणि Win 8 मध्ये चालते.
पुढील प्रमाणे कृती करावी –
- My Computer वर राईट क्लिक करा.
- Manage या पर्यायावर क्लिक करावे.

- आता Computer Management ची विंडो ओपन झालेली असेल. येथील डाव्या बाजूच्या पर्यायांमधून Disk Management हा पर्याय सिलेक्ट करावा.
- येथे डाव्या तुम्हाला तुमच्या कॉम्प्युटर मधील सर्व ड्राईव्ह आणि पार्टीशियन दिसतील.
- येथुन जो ड्राईव्ह तुम्हाला हाईड करावयाचा असेल त्यावर राईट क्लिक करुन Change Drive Letters and Path या पर्यायावर क्लिक करावे.
- आता एक लहान विंडोज आलेली असेल, येथे Remove या बटनावर क्लिक करावे नंतर Yes या बटनावर क्लिक करावे.
- आता My Computer मधून तुम्हाला तुमचा ड्राईव्ह हाईड झालेला दिसेल.
To unhide the drive:
- पुन्हा Disk Management मध्ये हाईड केलेला ड्राईव्ह परत आणण्यासाठी त्यावर राईट क्लिक करुन Change Drive Letters and Path हा पर्याय निवडावा
- नंतर Add या बटनावर क्लिक करुन हवे ते लेटर या ड्राईव्ह साठी निवडावे व नंतर Ok या बटनावर क्लिक करावे.
- आता तुम्हाला तुमचा ड्राईव्ह पुन्हा दिसेल.
Note: या ट्रिकने अगदी 100% आपण डाटा सुरक्षीत ठेऊ शकत नाही आणि कॉम्प्युटरची चांगली माहिती असणारा असा ड्राईव्ह सहज ओपन करु शकतो. तसेच लपवलेला ड्राईव्ह वर व्हायरचा अॅटॅक सुध्दा होऊ शकतो.
सौजन्य : itvishwa.com
सौजन्य : itvishwa.com