गुगल हे एक उत्तम आणि सर्वात जास्त वापरले जाणारे शक्तीशाली सर्च इंजीन आहे, पण यासोबतच अनेक मजेदार सर्च रिझल्ट आहेत, ज्याविषयी तुम्हाला कदाचित माहिती असेल किंवा नसेल.
येथे गुगल मधील उत्कृष्ट अश्या tricks, Easter eggs आणि secrets आहेत -
Google Sphere :

www.google.com वेब साईट ओपन करुन येथे Google Sphere टाईप करुन I’m feeling lucky” या पर्यायावर क्लिक करावे किंवा या लिंकवर क्लिक करावे..
येथे तुम्हाला दिसेल कि येथील सर्व गोष्टी स्क्रिन
वर तरंगत आहेत. जेव्हा तुम्ही येथील सर्च मध्ये काही टाईप करुन सर्च केले तरी आलेला सर्च रिझल्ट तरंगू लागेल. Google sphere कि अतिशय गमतीची आणि मजेशिर ट्रिक आहे. या तरंगत्या गोष्टींभोवती माऊस पॉइंटर फिरवा आणि करमणूक करा.


Google Gravity:
गुगल मध्ये जा आणि Google Gravity टाईप करुन “I’m feeling lucky” वर क्लिक करा किंवा या लींकला क्लिक करा..
येथे तुम्हाला दिसेल कि गुगल ने त्याचे गुरुत्व हरवले आहे आणि यातील सर्व गोष्टी खाली पडल्या आहेत. तुम्ही यातील सर्च बार टाईप करुन सर्च केलें तरी यातील सर्च रिझल्ट सुध्दा खाली पडतो. यातील कोणत्याही गोष्टीवर क्लिक करुन वर फेका आणि गंमत बघा.
Google Gravity Water:
गुगल मधील या आकर्षक परिणामात गुगल मधील
सर्व गोष्टी पाण्याखाली पडतात. गुगल मध्ये Google Gravity टाईप करुन “I’m feeling lucky”या पर्यायावर क्लिक करावे किंवा या लिंकला क्लिक करा.

Google Gravity Underwater हा एक आश्चर्यकारक परिणाम आहे. यात सर्च रिझल्ट सुध्दा पाण्याखाली तरंगतात. टाईमपास करण्यासाठी यातील सर्व वस्तु क्लिक करुन वर फेकाव्यात किंवा पाण्यावर लाट तयार करण्यासाठी माऊस खालून वर ड्रॅग करावा.

सौजन्य : itvishwa.com