या ब्लॉगवरील सर्व माहिती इन्टरनेट आणि तंत्रस्नेही शिक्षकांच्या मदतीने संकलित करण्यात आली आहे .......

Sunday, July 3, 2016

तुमच्‍या आवडत्‍या अॅप्‍लीकेशन किंवा फोल्‍डर साठी hotkey कशी तयार करावी?

तुमच्‍या आवडत्‍या अॅप्‍लीकेशन किंवा फोल्‍डर साठी hotkey कशी तयार करावी?

किरण पाटील | सप्‍टेंबर 20, 2014



तुम्हाला कॉम्प्युटरवर काम करतांना ब-याच वेळा अनेक डॉक्युमेंट, फोल्डर किंवा काही अॅप्लीकेशन हे पुन्हा पुन्हा लागत असतात. मग अश्या वेळी प्रत्येक वेळेस ते ओपन करतांना खुप वेळ तसेच मेहनत लागते जो तुम्ही यासाठी एक शॉटकट कि ठरवून वाचवू शकता. तुम्ही तुमच्या मर्जीप्रमाणे हव्या त्या फाईल, फोल्डर किंवा अॅप्लीकेशनला hotkey ठरवू शकता, जेणेकरुन कमी परिश्रमात ते सहज ओपन करता येतील.
विंडोज ऑपरेटींग सिस्टीम मध्ये हव्या अॅप्लीकेशन, फाईल किंवा फोल्डरसाठी शॉटकट कि तयार करण्याचे वैशिष्टयाचा समावेश आधिच करु ठेवला आहे.
How to assign a hotkey to an application in Windows 7:
  • स्टार्ट मेनू ओपन करा.
  • सर्च बार मध्ये ज्या प्रोग्रॅमसाठी hotkey ठरवायची आहे, त्याचे नाव टाईप करावे.
  • या प्रोग्रॅमवर राईट क्लिक करुन “Properties” हा पर्याय निवडावा.
  • Properties च्या डायलॉग बॉक्स मध्ये तुम्हाला “Shortcut key” हा पर्याय दिसेल.
  • येथील टेक्स्ट बॉक्स मध्ये hotkey साठी जी कि हवी असेल ती येथे टाईप करावी. विंडो येथे आपोआप या कि समोर “Ctrl + Alt +” आणेल. पण जर तुम्ही function कि किंवा numeric कि निवडली तर मग मात्र येथे “Ctrl + Alt +” टाकले जाणार नाही.
  • शेवटी "OK" या बटनावर क्लिक करावे.


How to assign a hotkey to a folder or file:
  • ज्या फाईल किंवा फोल्डरसाइी तुम्हाला hotkey हवी आहे त्यावर राईट क्लिक करुन “Create shortcut” हा पर्याय निवडावा.
  • आता या फाईल किंवा फोल्डरचा शॉटकट त्याच ठिकाणी तयार झालेला दिसेल.
  • या शॉटकटवर राईट क्लिक करुन “Properties” हा पर्याय निवडावा.
  • येथील “Shortcut key” समोर हवी कि टाईप करुन शेवटी Ok बटन प्रेस करावे.

WinHotKey हे एक मोफत अॅप्लीकेशन आहे, ज्यात तुम्ही सोप्या पध्दतीने हव्या त्या अॅप्लीकेशन किंवा फोल्डरसाठी तुमचा स्वतःचा शॉर्टकट तयार करु शकता. याविषयी अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

तुम्ही शॉटकट तयार करुन तुमचा वेळ आणि मेहनत कश्या पध्दतीने वाचवली? Comments मध्ये नक्की शेअर करा!