देशात फोर-जी कनेक्टीव्हिटीपेक्षाही जास्त वेगाने डाऊनलोड करण्याची सुविधा प्रदान करणारे ‘स्पीड फेच’ हे ऍप सध्या धमाल करत आहे.
‘स्पीड फेच’च्या मदतीने कुणीही अगदी सुपरफास्ट गतीने डाऊनलोड करू शकतो. हे एक खास ऍप्लीकेशन आहे. ते आपल्या स्मार्टफोनवर डाऊनलोड करून ऍक्टीव्हेट करावे लागते. यानंतर आपण ‘ओझोन वाय-फाय’ सेवेच्या माध्यमातून याचा उपयोग करू शकतो. इंटरनेटवर असणारे हॉलिवुड, बॉलिवुडसह भारतीय भाषांमधील चित्रपट, गाणी, व्हिडीओज, गेम्स आदींचा ऑफलाईन संग्रह करून ‘स्पीड फेच’ने हा डाटा अत्यंत सुसाट वेगाने डाऊनलोड करण्याचे तंत्र विकसित केले आहे. या माध्यमातून ६० मेगा बाईटस प्रति सेकंद इतक्या प्रचंड गतीने डाऊनलोड करण्याची सुविधा प्रदान करण्यात येते. मात्र सिग्नलमधील दोषामुळे प्रत्यक्षात १५ ते २० मेगा बाईटस प्रति सेकंद इतक्या गतीने इंटरनेटचा आनंद लुटण्याची सुविधा मिळत असल्याचा दावा या कंपनीतर्फे करण्यात आला आहे. सद्यस्थितीत ‘स्मार्ट फेच’ने ‘ओझोन वाय-फाय’शी करार केला आहे. यानुसार या कंपनीच्या देशभरातील दोन हजार हॉटस्पॉटच्या परिसरात याचा कुणीही वापर करू शकतो. येत्या काळात पाच हजार ठिकाणी याचा विस्तार करण्यात येणार आहे.
‘स्मार्ट फेच’ची सेवा मोफत असली तरी प्रत्यक्ष डाऊनलोड करतांना किती मुल्य लागेल याबाबत मात्र ‘ओझोन वाय-फाय’तर्फे माहिती देण्यात आलेली नाही.
by: shekhar patil