हलणार्या छायाचित्रांना स्थिर करण्यासाठी मायक्रोसॉफ्ट कंपनीने ‘हायपरलॅप्स’ नावाचे ऍप्लीकेशन विकसित केले आहे.
स्मार्टफोनच्या वाढत्या वापरामुळे व्हिडीओ छायाचित्रीकरणाच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. यातील बहुतांश छायाचित्रीकरणात आढळून येणारा एकमेव दोष म्हणजे ते स्थिर नसणे हाच होय. एक तर स्मार्टफोनच्या मदतीने स्टँड लावल्यासमान स्थिर व्हिडीओ शुटींग येत नाही. याशिवाय सध्या परिधान करण्यायोग्य अर्थात वेअरेबल गॅजेटस्चा जमाना आहे. या माध्यमातून करण्यात आलेले चित्रीकरण हे खुप अस्थिर असते. यातच सध्या ‘गोप्रो’सारख्या स्पोर्टस कॅमेर्यांचाही वापर होत आहे. यामुळे व्हिडीओ स्थिर करणार्या तंत्राची नितांत आवश्यकता आहे. तसे सध्या स्थिरीकरणासाठी अनेक टुल्स असले तरी त्याचा फारसा परिणामकारक वापर होत नाही. या पार्श्वभुमीवर मायक्रोसॉफ्ट कंपनीने ‘हायपरलॅप्स’ नावाचे सॉफ्टवेअर विकसित केले आहे. जोहान्स कोफ, मायकेल कोहेन आणि रिचर्ड स्केझेलस्की या तीन तंत्रज्ञांनी याला तयार केले आहे.
या सॉफ्टवेअरमध्ये तीन टप्प्यातून कितीही अस्थिर असणारे व्हिडीओ छायाचित्रण स्थिर करण्यात येते. यासाठी स्वतंत्र फ्रेम तयार करण्यात येते. सध्या हे सॉफ्टवेअर विंडोज ऍप्लीकेशनच्या स्वरूपात उपलब्ध करण्यात आले आहे.