आजकाल मुले आपल्यापेक्षा देखील स्मार्ट झाली आहेत .त्यामुळे तंत्रज्ञानाचा वापर करताना (इंटरनेटवर) त्यांनी एखाई चुकीची गोष्ट करू नये याकडे आपण लक्ष देणे आवश्यक ठरते.
गुगल ने लौंच केलेल्या या ऍप च्या मदतीने मुलाच्या स्मार्टफोनवरील सर्व घडामोडी आपल्या समोर असतील.
गुगलच्या म्हणण्यानुसार हे ऍप फक्त पालकांसाठी तयार केलेले आहे.परंतु आपण याद्वारे आपल्या मित्रांच्या स्मार्टफोनवर देखील नियंत्रण ठेऊ शकतो. आपण वापरकर्त्याने Google Play store मधून काय download केले आहे हे पाहू शकतो त्याचबरोबर असुरक्षित वेबसाईट चा प्रवेश देखील थांबवू शकतो.

Family Link
हे ऍप मुलांनी एखाद्या गेम किंवा ऍप वर किती वेळ घालवला यावरदेखील लक्ष ठेवते. ज्यामध्ये weekly आणि monthly
activity reports सोबत daily screen time limits देखील ठरवू शकता.

पालक या ऍप मध्ये मुलांच्या झोपण्याची वेळ देखील सेट करू शकतात. ज्यामध्ये सेट केलेल्या वेळी स्मार्टफोन आपोआप लॉक होतो. सोबतच तुम्ही तुमच्या स्मार्टफोनने इतर android device देखील नियंत्रित करू शकता.

ऍप मध्ये याव्यतिरिक्त SafeSearch, managing app permissions, know their
kid’s location याप्रकारच्या अन्य सुविधा देखील आहेत..त्याचबरोबर आपण कुटुंबातील इतर सदस्याला देखील मुलांच्या कृती नियंत्रित करण्यासाठी add करू शकता.
सध्या हे ऍप फक्त अमेरिकेत उपलब्ध असून लवकरच ते भारतात देखील कार्यान्वित होईल.