या ब्लॉगवरील सर्व माहिती इन्टरनेट आणि तंत्रस्नेही शिक्षकांच्या मदतीने संकलित करण्यात आली आहे .......

Wednesday, April 20, 2016

Zip File (झिप फाईल) म्हणजे काय ?

Zip  फाईल या प्रकारामध्ये एक किंवा एकापेक्षा जास्त फाईल्सना त्यांचा आकार कमी करुन एकाच फाईलमध्ये साठवून ठेवता येतात. Winzip  या सॉफ्टवेअरद्वारे वर सांगितल्या प्रमाणे फाईल्स Zip करता येतात.
समजा तुम्हाला ईमेलद्वारे बर्‍याच फाईल्स पाठवायच्या आहेत. अशावेळी त्या फाईल्स ईमेलमध्ये एक एक करुन अटॅच ( जोडायला ) करायला बराच वेळ लागतो. त्याएवजी जर त्यासर्व फाईल्स Zip  केल्या तर त्यांची एकच फाईल बनते सोबत त्यांचा आकार देखिल कमी होतो. यामूळे ती फाईल अटॅच करुन पटकन पाठविता येते.
आपल्या कॉम्प्युटरमध्ये जर Winzip  असेल तर कुठल्याही Zip  फाईलीला  किंवा असा आयकॉन असतो.

 Zip फाईल कशी बनवावी ?

एका किंवा एकापेक्षा जास्त फाईल्सना Zip  करण्यासाठी आपल्या कॉम्प्युटमध्ये Winzip  हे सॉफ्टवेअर असणे आवश्यक आहे. आपल्या कॉम्प्युटरमध्ये Winzip हे सॉफ्टवेअर आहे का नाही ते पहाण्यासाठी डेस्कटॉप वरील कोणत्याही फाईलला माऊसने 'राईट क्लिक' ( Right Click ) करुन बघा. त्याने येणार्‍या चौकोनात कुठेतरी Winzip  असे लिहिले असल्यास आपल्या कॉम्प्युटरमध्ये हा प्रोग्राम आहे व आपण फाईल्स Zip  करु शकता अथवा www.winzip.com/downwz.htm  या लिंक वरुन Winzip  प्रोग्राम डाउनलोड करु शकता.
Zip  फाईल करण्याची प्रक्रिया खाली दिली आहे.
१) आपणास ज्या फाईलीला अथवा ज्या फाईलींना एकत्र करुन Zip  फाईल करायची असेल त्या फाईलीला अथवा फाईलींना माऊसने सिलेक्ट करा.
२) आता त्या सिलेक्ट केलेल्या फाईलींमध्ये कुठल्याही फाईलीवर माऊसने 'राईट क्लिक (Right Click)' करा आणि त्या बाजूला येणार्‍या छोट्या चौकोनातील Add to Zip  वर क्लिक करा. आता आपल्यासमोर Zip  फाईल बनविणारा वेगळा नविन चौकोन उघडेल.

३) जर आपण एकाच फाईलीला Zip  फाईल करणार असाल तर या वर बाणाने दाखविलेल्या जागी त्याच फाईलीचे नाव येऊन त्यापूढे '.Zip' असे दिले असेल.  तर जर आपण एकापेक्षा अनेक फाईलींना सिलेक्ट करुन जर त्यांची Zip  फाईल करणार असाल तर त्याच बाणाने दाखविलेल्या जागी आपणास हवे असलेले नाव द्यावे लागेल व बाजूच्या 'Add'  बटणावर क्लिक करा.

४) बस्स. एवढेच केल्याने त्याच फोल्डरमध्ये आपण दिलेल्या नावाची Zip  फाईल बनेल.

टीप :- जर आपण एकाच फाईलीची Zip  फाईल करणार असाल तर त्या फाईलीवर 'राईट क्लिक ( Right Click )'  करुन येणार्‍या छोट्या चौकोनातील Add to _____________.zip  वर क्लिक करा.
 

 
 Zip फाईल कशी उघडावी ?

आपणास जर कुणी Zip  फाईल पाठविली असेल तर फाईलच्या नावापुढे '.Zip' असे दिले असेल. याचाच अर्थ त्या Zip  फाईलमध्ये एकापेक्षा जास्त फाईल्स साठविल्या आहेत. या Zip फाईलच्या आतील त्या सर्व फाईल्स पाहण्यासाठी ही Zip  फाईलीला Unzip  करणे म्हणजे उघडणे आवश्यक आहे.
टिप :- Zip  फाईल उघडण्यासाठी आपल्या कॉम्प्युटरमध्ये Winzip हा प्रोग्राम असणे आवश्यक आहे. हा प्रोग्राम आपल्या कॉम्प्युटरमध्ये आहे का नाही हे शोधण्याची गरज नाही जर आपल्या कॉम्प्युटरमध्ये Winzip हा प्रोग्राम असेल तर Zip फाईल उघडण्यासाठी तीच्यावर डबल क्लिक करताच तो प्रोग्राम सुरु होईल. डबल क्लिकद्वारे Winzip  हा प्रोग्राम सुरु झाला नाही तर तो तुम्हीwww.winzip.com/downwz.htm इथून डाउनलोड करु शकता.
Zip फाईल उघडण्याची प्रक्रिया खाली दिली आहे.
१) आपणास ज्या Zip फाईल उघडायची असेल तीच्यावर डबल क्लिक (Double Click) करा.
२) आता आपल्यासमोर 'WinZip'  प्रोग्रामच चौकोन उघडेल, त्यामध्ये ज्या फाईल्स झिप केलेल्या असतील त्यांची यादी असेल. आता त्यातील 'Extract'  या बटणावर क्लिक करा.

३) आता ती/त्या फाईल जेथे आपणास उघडून हव्या असतील ती जागा निवडावा, शक्यतो इथे 'Desktop' ही जागा निवडावी व पून्हा तेथील 'Extract'  या बटणावर क्लिक करा.

४) बस्स. एवढेच केल्याने ती/त्या फाईल्स कॉम्प्युटरच्या 'Desktop'  वर येतील.
५) या फाईल्स आपण उघडून पाहू शकता.



सौजन्य  :   sahajach .com