या ब्लॉगवरील सर्व माहिती इन्टरनेट आणि तंत्रस्नेही शिक्षकांच्या मदतीने संकलित करण्यात आली आहे .......

Wednesday, August 10, 2016

स्मार्टफोनच्या विश्वात आम्ही…

जगभरात एक अब्जाहून अधिक लोकं स्मार्टफोन वापरतात, असा निष्कर्ष अमेरिकेतील संशोधकांनी लावला आहे.

 जगभरात एक अब्जाहून अधिक लोकं स्मार्टफोन वापरतात, असा निष्कर्ष अमेरिकेतील संशोधकांनी लावला आहे. अँपल कंपनीच्या आय़फोननंतर टेक्नॉलॉजीच्या बाजारात अनेक स्मार्टफोन्स विक्रीला आले. त्यामुळे  टेकसॅव्ही लोकांनाही हे स्मार्टफोन खरेदी करण्याची आयती परवणीच मिळाली.
फेसबूक या सोशल नेटवर्कीग साईटवर दोन आठवड्यांपूर्वी यासंदर्भात माहिती देण्यात आली होती. या माहितीसाठी आयएएनएस, आरआयए नोव्होस्टीच्या रिपोर्टचा दाखला देण्यात आला होता. भारत,चीन, दक्षिण आफ्रिका यांसारख्या विकसनशील देशांमध्ये स्मार्टफोन वापरणा-यांची संख्यासुद्धा झपाट्याने वाढत आहे. स्मार्टफोनच्या शोधासाठी संशोधकांना सोळा वर्षे तपश्चर्या करावी लागली. पण अवघ्या तीन वर्षांतचं स्मार्टफोनच्या युजर्सची संख्या अब्जावधींच्या घरात गेली आहे. पुढील तीन वर्षात ही संख्या दोन अब्जांच्या घरात जाण्याची शक्यता असल्याचं स्ट्रॅटेजी अँनालीटीक्सचे कार्यकारी अध्यक्ष नेल मॅस्टोन यांनी सांगितले.
नोकियाने १९९६ मध्ये सगळ्यात पहिला स्मार्टफोन लॉन्च केला होता. पण २००७ मध्ये आलेल्या आयफोनने स्मार्टफोनच्या विश्वात ‘अब्जावधीं’ची क्रांती केली. नुकतचं आयफोन 6 च्या लॉन्चिंगनंतर अवघ्या महिन्याभरातचं ५ कोटींचा आकडा पार केला आहे.
 स्मार्टफोनमधील टॉप 10 आवडती अँप्लिकेशन्स
  • वॉट्स अप – तुमच्या मित्र मैत्रिणींशी फ्री चँटींग करु शकता.
  • फ्लाईट व्ह्यू – विमान उड्डाणांची माहिती मिळते.
  • ईस्कायगाईड- विविध एअरलाईन्स कंपन्यांचे दूरध्वनी क्रमाकं, हॉटेल्सचे नंबर्स यांची माहिती
  • एअरपोर्ट मॅप्स – अमेरिका आणि कँनडामधील सर्व एअरपोर्टची माहिती, एटीएमची माहिती
  • वर्ल्डमेट लाईव्ह – हवामान, देशांतील करन्सी एक्सेंज रेट्सची माहिती
  • एव्हरनोट – एखादी लिखीत माहिती आपण एव्हरनोटमधील कॅमे-याच्या माध्यमातून कायमस्वरुपी ‘सेव्ह’करु शकतो.
  • ईऑफिस – गुगल डॉक्यूमेंट्सवर तुम्ही या अँपच्या माध्यमातून काम करु शकता
  • स्प्लॅशआयडी – तुमचे महत्वाचे पासवर्ड्स तुम्ही सेव्ह करु शकता
  • गुगल रिडर – तुमच्या आवडत्या न्यूज साईट्स आणि ब्लॉग्सचं अपडेट्स ठेवू शकता.
  • गुड फुड – तुम्ही उभे असलेल्या ठिकाणाहून जवळंचं रेस्टॉरंट तुम्ही या अँपच्या माध्यमातून ट्रॅक करु शकता.