मुंबई : ग्राहकांचा कॉल ड्रॉप झाल्यास व्होडाफोन 10 मिनिटांचा फ्री टॉकटाईम देणार आहे. व्होडाफोन डिलाईट बोनान्झाच्या माध्यमातून ग्राहकांना कॉल ड्रॉप झाल्यास 10 मिनिटांचा टॉकटाईम मिळेल.
फोनवर बोलत असताना फोन अचानक कट झाला तर व्होडाफोनच्या ग्राहकांना 199 या नंबरवर 'BETTER'लिहून एसएमएस पाठवावा लागणार आहे, यानंतर तुम्हाला 10 मिनिटांचा फ्री टॉकटाईम मिळेल.
देशभरातल्या बहुतेक ग्राहकांना कॉल ड्रॉपच्या समस्येला सामोरं जावं लागतं आहे. यावर तोडगा काढण्यासाठी सरकार आणि मोबाईल नेटवर्किंग कंपन्यांमध्ये बैठक झाली. कॉल ड्रॉपची समस्या लवकर सोडवा असं सरकारनं या कंपन्यांना सांगितलं आहे.