कोणतेही अॅप न डाऊनलोड करतांनाही संगणकावर वापरण्याची सुविधा लवकरच क्रोम ऑपरेटींग प्रणालीवर प्रदान करण्यात येणार असून याबाबत गुगलतर्फे अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.
सध्या आपल्याला कोणतेही अॅप वापरायचे असल्यास ते गुगल प्ले स्टोअरवरून डाऊनलोड करून इन्स्टॉल करावे लागते. समजा आपल्याला कुणी युट्युब व्हिडीओची लिंक पाठवली असता त्यावर क्लिक केल्यानंतर त्या अॅपकडे रिडायरेक्ट करण्यात येते. अर्थात ते आपल्या मोबाईलवर नसले तर संबंधीत अॅप डाऊनलोड केल्याशिवाय आपण तो व्हिडीओ पाहू शकणार नाही. मात्र गुगलने आता इन्स्टंट अॅप वापरण्याची सुविधा प्रदान केली आहे. क्रोम ऑपरेटींग प्रणालीवर चालणार्या संगणकांमध्ये अशा पध्दतीने कुणीही अँड्रॉईड अॅप वापरू शकेल. अर्थात यातून अँड्रॉईड अॅप संगणकावर वापरण्याचा मार्गदेखील मोकळा झाला आहे. हे नेमके कसे होणार? याबाबत गुगलने जाहीर केले नसले तरी येत्या काही महिन्यांमध्ये संबंधीत सुविधा युजर्सला प्रदान करण्यात येणार असल्याचे सुचित करण्यात आले आहे.