या ब्लॉगवरील सर्व माहिती इन्टरनेट आणि तंत्रस्नेही शिक्षकांच्या मदतीने संकलित करण्यात आली आहे .......

Tuesday, October 18, 2016

लॅपटापचा डिस्प्ले होणार सुरक्षित !

hpsureview
एचपी कंपनीने ‘श्युअर व्ह्यू’ या तंत्रज्ञानाला विकसित केले असून याच्या मदतीने आता दुसरा कुणीही व्यक्ती लॅपटॉपच्या डिस्प्लेवर पाहू शकणार नाही.
लॅपटॉपवर काम करत असतांना दुसरे जण नाहक डोकावून पाहत असतात. यामुळे अनेकांना त्रासही होतो. यावर आता एचपी कंपनीने नामी उपाय शोधून काढला आहे. या कंपनीने ‘श्युअल व्ह्यू’ ही प्रणाली विकसित केली आहे. यात ‘एफ२’ हे बटन दाबल्यानंतर स्क्रीनमध्ये अशा पध्दतीने लाईट सिस्टीम अ‍ॅक्टीव्हेट होते की, यातून फक्त समोर असणार्‍या व्यक्तीलाच दिसू शकते. अन्य कोणत्याही कोनातून पाहिल्यास हा डिस्प्ले बंद असल्याचे दिसते. एचपी कंपनी सप्टेंबर महिन्यात एलीटबुक ८४० आणि १०४० हे दोन कन्व्हर्टीबल लॅपटॉप लाँच करणार असून यात हे फिचर असणार आहे.
shekhar patil