एचपीचा नवा लॅपटॉप क्रोमबुक 11G5 नुकताच लाँच झाला. या लॅपटॉपचे टचस्क्रिन वेरिएंट आणि स्टॅंडर्ड मॉडेल अशा दोन प्रकारात लाँच करण्यात आला. कंपनीचा दावा आहे की, टचस्क्रिन वेरिएंटची बॅटरी बॅकअप एकावेळेस 11 तास आहे. तर स्टँडर्ड मॉडेलची बॅटरी 12 तास 30 मिनीट कार्यरत राहू शकते. या दोन्ही प्रकारातील लॅपटॉपला 3.1चे दोन यूएसबी पोर्ट, आणि एक हेडफोन जॅक असेल.
या लॅपटॉपमध्ये दोन पर्याय उपलब्ध असतील, ज्यामध्ये गोरिल्ला ग्लास प्रोटेक्शनने लेस 11.6 इंचाचा एचडी (1366 x 768 पिक्सल) आयपीएस टचस्क्रिन डिस्प्ले आणि 11.6 इंचाचा एचडी (1366 x 768 पिक्सल) अॅन्टी ग्लेअर स्टॅंडर्ड डिस्प्ले असेल.
लॅपटॉपमध्ये क्रोम ओएस इंटरफेस असणार आहे. म्हणजे, या लॅपटॉपमध्ये अॅन्ड्राइड अॅपसाठी सपोर्ट असेल. गूगलने गूगल प्ले स्टोअरचा सपोर्ट असलेल्या क्रोमबुकची सूची नुकतीच जाहीर केली होती.
या लॅपटॉपमध्ये इंटल सेलेरॉन एन 3060 (ड्यूअल कोअर, 2 एमबी कैशे, 2.40 गीगाहर्टसचा क्लॉक स्पीड)सोबत 2 जीबी किंवा 4 जीबीची रॅम देण्यात आली आहे. तसेच एचपीचा ट्रूव्हिजन एचडी वेबकॅमही देण्यात आला आहे. स्टोअरेजसाठी 16 जीबी किंवा 32 जीबी हार्डडिस्कचा पर्यायही उपलब्ध असेल.
क्रोमबुक 11 G5 ला विद्यार्थी आणि शिक्षकांना हाताळण्यासाठी सोईचे होईल, यादृष्टीने बनवण्यात आले आहे. याच्या किमतीची सुरुवात 12,800 रुपयांपासून सुरुवात होईल. हा जुलैपासून ऑनलाइन उपलब्ध होणार असूनस येत्या ऑक्टोबर महिन्यापासून रिटेल दुकानांमध्ये उपलब्ध असेल.