या ब्लॉगवरील सर्व माहिती इन्टरनेट आणि तंत्रस्नेही शिक्षकांच्या मदतीने संकलित करण्यात आली आहे .......

Sunday, August 21, 2016

पंतप्रधानांची वेबसाईट आता मराठीतही!

बहुभाषिय संवाद होण्यासाठी सरकारने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. पीएमओ अर्थात पंतप्रधान मोदी यांच्या कार्यालयाची वेबसाईट आता मराठीसह देशातील महत्वाच्या सहा प्रादेशिक भाषांमध्ये पाहता येणार आहे.

परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्या हस्ते आज वेबसाईटचं मराठी, गुजराती, बंगाली आणि मल्याळम या भाषांमध्ये अनावरण करण्यात आलं. हिंदी आणि इंग्रजी भाषांचे पर्याय वेबसाईटवर अगोदरपासूनच उपलब्ध आहेत.


आवडत्या भाषेचा पर्याय देण्याचा प्रयत्न
सध्या वेबसाईट सहा भाषांमध्ये उपलब्ध असली तरी येत्या काळात लवकरच देशातील सर्व भाषा पीएमओच्या वेबसाईटवर उपलब्ध असणार आहेत. जनतेच्या आवडत्या भाषेत त्यांच्याशी जास्तीत जास्त संवाद साधणं हे एनडीए सरकारचं उद्दीष्ट आहे. हा प्रयत्न त्याचाच एक भाग आहे, असं स्वराज यांनी सांगितलं.

वेबसाईट बहुभाषिय झाल्यामुळे जनतेशी जोडून राहणं अधिक सोपं होणार आहे, असं पंतप्रधान मोदी यांनी ट्विटरद्वारे सांगितलं.