या ब्लॉगवरील सर्व माहिती इन्टरनेट आणि तंत्रस्नेही शिक्षकांच्या मदतीने संकलित करण्यात आली आहे .......

Tuesday, August 2, 2016

गुगल प्ले स्टोअरवर ‘फॅमिली लायब्ररी’

गुगलने आपल्या प्ले स्टोअरवर खरेदी केलेल्या बाबींना आपल्या कुटुंबातील व्यक्तींसोबत शेअर करण्याची सुविधा आता प्रदान करण्यात आली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून गुगल प्ले स्टोअरवर फॅमिली शेअरिंग येणार असल्याची चर्चा सुरू होती. यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे. गुगलने आता ‘फॅमिली लायब्ररी’ या नावाने नवीन सुविधा प्रदान केली आहे. आजवर समजा मी गुगल प्ले स्टोअरवरून एखादे अ‍ॅप, चित्रपट, पुस्तक, म्युझिक अल्बम, टिव्ही शो वा गेम खरेदी केला तर फक्त मला माझ्याच स्मार्टफोन वा अन्य उपकरणावरून याचा उपयोग करणे शक्य होते. आता मात्र माझ्या कुटुंबातील सहा जणांना अतिरिक्त एक पैसाही न देता मी खरेदी केलेल्या सर्व बाबी वापरणे यातून शक्य होणार आहे. यासाठी ‘गुगल प्ले स्टोअर’वर साईन इन केल्यानंतर आपल्या कुटुंबातील सहा जणांच्या नावासह त्यांचा मोबाईल क्रमांक, ई-मेल आयडी आदी माहिती भरण्याची सुविधा दिलेली आहे. एकदा का हे पुर्ण केले की मग ते इतर सहा जणही याची सहजगत्या वापर करू शकणार आहेत. विशेष म्हणजे यातील एखादा सदस्य कमी करून दुसर्‍याचा समावेश करण्याची सुविधाही यात दिलेली आहे. सध्या निवडक राष्ट्रांमध्ये उपलब्ध असणारी ही सुविधा येत्या काही दिवसांमध्ये भारतासह अन्य देशांमधील युजर्सला मिळणार आहे. याचसोबत गुगलने आपल्या म्युझिक सेवेसाठीही १४.९९ डॉलर्स प्रतिमहा या दराने याच स्वरूपाची सेवा लाँच केली आहे.