लेनोव्हो कंपनीने अतिशय उत्तमोत्तम फिचर्सनी सज्ज असणारा एयर १३ प्रो लॅपटॉप लाँच केला असून
यात फिंगरप्रिंट स्कॅनरची सुविधाही प्रदान करण्यात आली आहे.
शाओमीने अलीकडेच लॅपटॉप उत्पादनात पदार्पण करत शाओमी एमआय नोटपॅड एयर हे मॉडेल लाँच केले आहे.
मॅकबुक एयर या अॅपलच्या मॉडेलला शाओमीने तगडे आव्हान उभे केल्याचा यातून दिसून आले आहे.
या पार्श्वभुमिवर आता लेनोव्होने शाओमीलाच आव्हान देत एयर १३ प्रो हे मॉडेल लाँच केले आहे.
यात १३.३ इंच आकारमानाचा फुल एचडी क्षमतेचा आयपीएस डिस्प्ले असेल.
यात इंटेल आयलेक कोअर आय५/आय७ प्रोसेसर्स देण्यात आले आहेत.
याची रॅम चार जीबी इतकी तर स्टोअरेज २५६ जीबी इतके प्रदान करण्यात आले आहे.
वर नमुद केल्याप्रमाणे यात फिंगरप्रिंट स्कॅनरदेखील देण्यात आले आहे.
सध्या हा लॅपटॉप चीनमध्ये लाँच करण्यात आला असून तो येत्या काही महिन्यांमध्ये भारतात सादर
होण्याची शक्यता आहे.