तुमच्यावर कधी तरी अशी वेळ नक्कीच आली असेल, जेव्हा तुम्ही तुमचा किंवा तुमच्या सोबत मित्र किंवा कुटूंबातील व्यक्तींसोबत घेतलेल्या फोटोमध्ये इतर नको असलेली माणसे किंवा इतर गोष्टी आलेल्या असतील ज्या तुम्हाला नको असतील. मग अश्या वेळेस या नको असलेल्या गोष्टी काढून टाकण्यासाठी तुम्हाला फोटोशॉप चा वापर करावा लागेल. पण तेही काही इतके सोपे नाही. यासाठी तुम्हाला फोटोशॉपचे चांगल्या प्रकारे ज्ञान असणे आवश्यक आहे. कारण हे करण्यासाठी फोटोशॉप मधील Clone Stamp Tool किंवा Healing brush tool चा वापर करावा लागेल.
पण जर तुम्हाला फोटोशॉपचे चांगले ज्ञान नसेल तर ? मग यासाठी तुमच्यासाठी पुढील टूल आहे, ज्यात सोप्या पध्दतीने तुम्ही नको असलेल्या गोष्टी फोटामधून काढून शकता -
Inpaint
Inpaint हे एक अतिशय प्रभावी टूल आहे, ज्यांचा वापर करुन तुम्ही अतिशय सोप्या पध्दतीने फोटो मधील नको असलेल्या गोष्टी काढून टाकू शकता. आणि यासाठी तुम्हाला यात खुप एक्सपर्ट होण्याची देखील गरज नाही. याचा वापर करुन तुम्ही फोटोमधील नको असलेल्या व्यक्ती, लहान मोठे ऑब्जेक्ट, वॉटरमार्क, तारखेचा शिक्का यासारख्या गोष्टी सहजपणे काढून टाकू शकता.
इमेज मधील Background कसे काढावे
एखादया फोटोमधील बॅकग्राउंड काढून टाकणे हे सुध्दा खुपदा करावे लागणारे आणि कंटाळवाणे काम आहे. कारण यासाठी बराच वेळ आणि मेहनत लागते. तसचे फोटोशॉपचे देखील चांगल्या पदध्तीचे ज्ञान असणे आवश्यक असते. तसेच यासाठी फोटोशॉप मध्ये Magnetic Lasso Tool, Polygon Lasso Tool किंवा Magic Wand Tool यांचा वापर करावा लागतो. म्हणून यावर पुढील पर्याय आहे -
हि वेबसाईट त्यांच्यासाठी आहे, ज्यांना फोटोशॉप मध्ये जास्त ज्ञान नाहि किंवा तेवढा वेळ नाही. येथे तुम्ही ऑनलाईन फोटोमध्ये काम करु शकता.
फोटोशॉप मधील बॅकग्राउंड काढून टाकण्यासाठी हो फोटो या वेबसाइट मध्ये फक्त drag आणि drop करावा. नंतर जो भाग तसाच राहू दयायचा आहे तो हिरव्या रंगाने व जो भाग काढून टाकावयाचा आहे जो भाग लाल रंगाने अधोरेखीत करावा. आता स्क्रिनच्या उजव्या बाजूला तुम्हाला याचा परिणाम बघायला मिळेल. नंतर हा फोटो तुम्ही डाऊनलोड किंवा शेअर करु शकता.