या ब्लॉगवरील सर्व माहिती इन्टरनेट आणि तंत्रस्नेही शिक्षकांच्या मदतीने संकलित करण्यात आली आहे .......

Saturday, July 30, 2016

लेनोव्होचा प्रोजेक्टरयुक्त टॅबलेट

लेनोव्हो कंपनीने भारतात इनबिल्ट प्रोजेक्टर असणारा योगा टॅब ३ प्रो हा टॅबलेट ३२,९९० रूपयांना सादर केला आहे.
अॅपल, मायक्रोसॉफ्ट, गुगल आदी मातब्बर कंपन्यांनी अत्यंत सरस फिचर्स असणारे टॅबलेट लॉंच केले आहेत. याला टक्कर देण्यासाठी अन्य कंपन्या आपापल्या उत्पादनांमध्ये नाविन्यपुर्ण फिचर्सचा समावेश करत आहेत. लेनोव्हो कंपनीने हाच मार्ग निवडत आपल्या योगा टॅब ३ प्रो या मॉडेलमध्ये इनबिल्ट प्रोजेक्टर दिले आहे. याच्या मदतीने कुणीही आपल्या टॅबलेटमधील कंटेंट (व्हिडीओज, प्रेझेंटेशन्स आदी) अगदी कुठेही प्रक्षेपित करू शकतो. या मॉडेलची ही सर्वात मोठी खासियत ठरली आहे. अर्थात यातील अन्य फिचर्सही उत्तम प्रकारचे आहेत.
लेनोव्हो योगा टॅब प्रो ३ मध्ये १०.१ इंच आकारमानाचा आणि क्युएचडी अर्थात २५६० बाय १६०० पिक्सल्स क्षमतेचा डिस्प्ले दिलेला आहे. याची रॅम दोन जीबी तर इनबिल्ट स्टोअरेज ३२ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने १२८ जीबीपर्यंत वाढविणे शक्य आहे. यात १३ आणि ५ मेगापिक्सल्स क्षमतेचे दोन कॅमेरे दिलेले आहेत. यात फोर-जी नेटवर्क सपोर्ट असणारे एक सीमकार्ड चालू शकते. हा टॅबलेट भारतीय ग्राहकांना ३९,९९० रूपयांत मिळणार आहे.