या ब्लॉगवरील सर्व माहिती इन्टरनेट आणि तंत्रस्नेही शिक्षकांच्या मदतीने संकलित करण्यात आली आहे .......

Friday, July 29, 2016

अडोबचे अनोखे फोटो अॅप



अडोबचे अनोखे फोटो अॅप

कोणत्याही प्रेक्षणीय स्थळासमोरील गर्दी आपोआप नष्ट करून छायाचित्र घेणारे अनोखे फोटो अॅप अडोब कंपनीने विकसित केले आहे.
ताजमहाल, गेटवेऑफ इंडिया याचप्रमाणे जगातील बहुतेक सर्व प्रख्यात ठिकाणी मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. परिणामी येथे भर दिवसा त्या वास्तू वा स्थळाचे फोटो काढणे अत्यंत जिकरीचे असते. म्हणजे अन्य पर्यटकांच्या वर्दळीमुळे आपण फोटो घेऊ शकत नाही. नेमकी हीच समस्या लक्षात घेत अडोब कंपनीने फोटो अॅप तयार केले आहे. याची खासियत म्हणजे कोणत्याही पर्यटक स्थळासमोर कितीही गर्दी असली तरी त्याला आपोआप हटवून त्या स्थळाचे छायाचित्र घेता येणार आहे.
यासाठी अडोब कंपनीने खास अलगॉरिदम तयार केला आहे. याच्या मदतीने त्या स्थळाच्या समोर हलणार्‍या वस्तू क्षणार्धात ओळखता येतात. यानंतर हलणार्‍या वस्तूंना स्वयंचलितरित्या हटविण्यात (प्रत्यक्ष नव्हे तर कॅमेर्‍यात) येते. यामुळे त्या पर्यटनस्थळासमोर एकही व्यक्ती उभा नसतांनाचा फोटो घेता येतो. अडोबने या अॅपची यशस्वी चाचणी घेतली आहे. यामुळे येत्या काही महिन्यांमध्ये याला सादर करण्यात येणार असल्याचे मानले जात आहे.