या ब्लॉगवरील सर्व माहिती इन्टरनेट आणि तंत्रस्नेही शिक्षकांच्या मदतीने संकलित करण्यात आली आहे .......

Thursday, June 9, 2016

संगणकावरून करा अँड्रॉईड स्मार्टफोनचे नियंत्रण


संगणकावर काम करत असतांना आपल्या अँड्रॉईड फोनचे नियंत्रण त्याला हात लावतांनाही करणे आता शक्य आहे. यासाठी क्रोम ब्राऊजरमधील एक एक्सटेन्शन उपयोगात येणार आहे.



क्रोमच्या वेब स्टोअरवरक्लॉकवर्डमॉडया कंपनीने वायसॉर हे एक्सटेन्शन सादर केले आहे. सध्या ते बेटा व्हर्शनमध्ये उपलब्ध आहे. हे आपल्या संगणकावर इन्टॉल केल्यानंतर आपण आपला अँड्रॉईड फोन याला युएसबीच्या माध्यमातून कनेक्ट करू शकतो. यामुळे स्मार्टफोनवरील स्क्रीन हा संगणकावर येतो. यातून आपण आपल्याला हवे ते फंक्शन वापरू शकतो.
खरं तर संगणकाशी स्मार्टफोन कनेक्ट करण्यासाठी अनेक पर्याय आहेत. यातऑल कास्टहे ऍप मोठ्या प्रमाणात वापरण्यात येते. मात्र यापेक्षा वायसॉर हे वापरण्यास सुलभ आहे. या माध्यमातून अँड्रॉईड स्मार्टफोन वापरण्यात येत असला तरी क्रोमवर हे एक्सटेन्शन विंडोज, मॅक आणि क्रोम या ऑपरेटींग प्रणालींसाठी उपलब्ध आहे.


by shekhar patil