कोणत्याही रूग्णाला औषधी घेण्याची आठवण करून देणारे अॅप्लीकेशन आता सादर करण्यात आले आहे.
वेळेवर गोळ्या वा औषधी घेणे हे अत्यंत आवश्यक असते. आपण अनेकदा औषधी घेण्यास विसरून जातो. यामुळे बरे होण्यास विलंब तर होतोच पण यातून संबंधीत विकार चिघळण्याची शक्यतादेखील असते. या पार्श्वभुमीवर ‘माय हेल्थ सवेर्झ’ या कंपनीने ‘मायहेल्थसवेर्झ’ नावाचे अॅप्लीकेशन सादर केले आहे. हे अॅप्लीकेशन अँड्रॉईड, आयओएस आणि विंडोज प्रणालीवर उपलब्ध आहे. हे अॅप डाऊनलोड केल्यानंतर आपण डॉक्टरने दिलेल्या प्रिस्क्रिप्शनची माहिती यात टाकल्यानंतर संबंधीत गोळ्या, सिरप आदी औषधी केव्हा घेणार ही माहिती स्टोअर होते. यानंतर त्या-त्या वेळेला अलार्मच्या सहाय्याने औषधी घेण्याचे सुचविण्यात येते. विशेष म्हणजे स्मार्टफोन नसणार्यांना एसएमएसच्या सहाय्याने अलर्ट मिळण्याचीदेखील सुविधा करण्यात आली आहे.