जीमेल ईमेलच्या अँड्रॉईड अॅपच्या नवीन व्हर्शनमध्ये
आता अन्य ईमेलची सुविधादेखील प्रदान करण्यात आली आहे.
जीमेल या गुगलच्या सेवेचे अँड्रॉईड अॅप जगभरात लोकप्रिय आहे. अर्थात जीमेलचा वापर करणार्यांना अन्य ई-मेलची सुविधा हवी असल्यास अन्य ईमेल अॅप वापरण्यावाचून आजवर पर्याय नव्हता. आता मात्री जीमेल अँड्रॉईड अॅपच्या पाचव्या व्हर्शनमध्ये या समस्येवर मात करण्यात आली आहे.
गुगलने जीमेल अँड्रॉईडच्या ५.० या व्हर्शनची नुकतीच घोषणा केली आहे. याद्वारे हे अॅप अधिक आकर्षक करण्यात आली आहे. याची रंगसंगती बदलण्यात आली आहे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे याद्वारे आता याहूमेल, आऊटलुक आणि एओल आदी ई-मेलसाठी दुसर्या अॅपवर लॉगीन करण्याची आवश्यकता उरलेली नाही. या सर्वांचे इनबॉक्स याच अॅपमध्ये पहावयास मिळणार आहे. यातून ईमेल तपासणे, पाठविणे वा डिलीट करणे शक्य होणार आहे. अँड्रॉईडच्या ४.० आईसक्रीम सँडविचपेक्षा पुढील व्हर्शनसाठी हे अॅप सुसंगत करण्यात आले आहे. विशेष म्हणजे ते अँड्रॉईडच्या ५.० अर्थात लॉलीपॉप व्हर्शनवरही ते चालणार आहे. येत्या काही दिवसांत ते अपडेशनसाठी उपलब्ध होणार असल्याची माहिती गुगलतर्फे देण्यात आली आहे.