हार्ड डिस्कवर कोणता डेटा सर्वात जास्त जागा घेत आहे हे शोधण्यासाठी या टूल्सचा फायदा घ्या
ऑगस्ट 04, 2015
हार्ड डिस्कची क्षकता किती आहे याचा काहीही फरक पडत नाही कारण आपल्याला ती नेहमीच पुरेसे आहे असे वाटत नाही आणि आपल्याला नेहमीच जास्त स्टोरेजची गजर भासते. हे का घडते? कारण आज कॉम्प्यूटरचा उपयोग फक्त एक काम करण्याचे डिव्हाइस म्हणून होत नाही तर त्याचा वापर सोशल अॅक्टीव्हिटी, एंटरटेनमेंट आणि खुप काही गोष्टींसाठी होतो. आणि म्हणूनच हार्ड डिस्क मध्ये महत्वाच्या डेटासोबत इमेजेस, म्युझिक, व्हिडिओ आणि खुप काही स्टोअर केलेले असते.आपल्याला खुप वाइट वाटते जेव्हा आपण काही महत्वाचा डेटा हार्ड डिस्कवर जागा शिल्लक नसल्यामुळे स्टोअर करू शकत नाही. आणि मग आपण नविन हार्ड डिस्क घेण्याबददल विचार करू लागतो जे खुप खर्चिक आहे. पण जरा थांबा! येथे यासाठी विनामूल्य पर्याय उपलब्ध आहे.तुम्ही नको असलेला डेटा डिलीट करून हार्ड डिस्कची स्टोरेज कॅपॅसिटी वाढवू शकता. पण यासाठी आधी तुम्हाला कोणता डेटा डिस्कवर जास्त जागा व्यापत आहे हे शोधावे लागेल आणि यासाठी खुप वेळ आणि मेहनत लागेल. किंवा खालील टूल्सचा वापर करा, जे तुम्हाला हार्ड डिस्कवर कोणता डेटा जास्त जागा घेत आहे हे अॅनॅलिसीस करण्यासाठी मदत करतील.
1) HDGraph:
HDGraph हा विंडोजसाठी एक फ्री टूल आहे जो हार्ड डिस्क वापराचा मल्टी लेव्हल पाय चार्ट काढतो. हार्ड स्पेस वापराच्या या ग्राफिकल डिस्प्ले मध्ये तुम्ही सहजपणे कोणत्या डिरेक्टरीज आणि सबडिरेक्टरीज जास्त जागा घेत आहे हे अॅनॅलिसिस करू शकता.विंडोज एक्सप्लोरर मधील सर्व स्टोरेज साठी हा कॉम्पॅक्टीबल आहे - हार्ड डिस्क ड्राइव्ह, युएसबी, नेटवर्क ड्राइव्ह, सिडी, डिव्हीडी इ.
हा सिलेक्ट केलेल्या फोल्डर मधील सर्व सब फोल्डर्स आणि डिरेक्टरीचा रिंग स्टाइल मध्ये एक पाय चार्ट ड्रॉ करतो, ज्यांची स्पेस ही त्या फोल्डरच्या समप्रमाणात असते. यात एकाच चार्ट मध्ये अनंत लेव्हल पर्यंतच्या फोल्डर्सचा ट्री दिसतो आणि हा चार्ट सेव्ह करून ठेवता येतो तसेच यात राइट क्लिक करून कोणतेही फोल्डर ओपन करता येते. हा एक छोटा प्रोग्राम आहे जो इन्स्टॉल करण्याची गरज नाही.
2) WinDirStat:
WinDirStat हे मायक्रोसॉफ्ट विंडोज साठी आणखी एक, उत्तम फ्री व ओपन सोर्स युझेस अॅनॅलाइझर सॉफ्टवेअर आहे. हे सर्व फाइल्सच्या व्हिज्युअल डिस्प्ले सह स्टोरेज मध्ये डेटा कश्या प्रकारे स्टोर केला आहे हे दर्शवते.हा प्रोग्राम सुरू झाल्यानंतर तो सिलेक्ट केला ड्राइव्ह पुर्ण स्कॅन करतो आणि त्याचा एक ट्रि मॅप तयार करतो ज्यात प्रत्येक फाइल एक कलर रेक्टँगल मध्ये दिसते, ज्यांचा एरिआ हा त्या फाइलच्या आकाराच्या सम प्रमाणात असतो.
या रेक्टँगलचा कलर हा एक्सटेंशन लिस्ट मध्ये दाखविल्याप्रामणे त्यांचा फाइल टाइप दर्शवितो. WinDirStat चा अजून एक फायदा म्हणजे एकादा तुम्हाला माहित झाले कि कोणते फोल्डर किंवा फाइल जास्त जागा घेत आहे तेव्हा तुम्ही याच प्रोग्राम मध्ये त्यावर राइट क्लिक करून डिलीट करू शकता.
3) SpaceSniffer:
SpaceSniffer मायक्रोसॉफ्ट विंडोज प्लॅटफॉर्म साठी मोफत कॉम्प्यूटर डिस्क स्पेस अॅनॅलाइझर आहे. हे फोल्डर आणि फाइल यांचे स्ट्रक्चर एक ट्रीमॅप व्हिज्यूयलायझेशन लेआउट मध्ये समजून घेण्यास मदत करते.
SpaceSniffer फाइल्स आणि फोल्डर्सला जलद स्कॅन करते आणि एकात एक अश्या बॉक्सच्या मालिका मध्ये तुमचा डेटा दाखवतो. प्रत्येक रेक्टँगल हे त्याचा फाइलच्या आकारच्या समप्रमाणात असते. यावर डबल क्लिक करून अजून डिटेल पाहू शकतो. यात फाइलचे नाव, तारीख, आकार यांवर फिल्टर करून रिपोर्ट बघता येतो. या रेक्टँगवर राइट क्लिक करून फाइल किंवा फोल्डर डिलीट करता येते.
हे सॉफ्टवेअर इन्स्टॉल करण्याची गजर नाही तर फक्त डाउनलोड करा आणि रन करा.
4) JDiskReport:
JDiskReport वरील डिस्क विश्लेशणाक एक लोकप्रिय पर्याय आहे. आपण फाइल व संचयीका तुमच्या डिस्क ड्राइव्हस् वापर किती जागा समजून सक्षम करते, आणि तो आपल्याला कालबाह्य फाइल्स आणि फोल्डर्स शोधण्यात मदत करते.
JDiskReport हा हार्ड डिस्क अॅनॅलाइज करतो आणि अनेक स्टॅटिटिक्स गोळा करतो ज्या तुम्ही चार्ट आणि टेबलच्या फॉर्मट मध्ये बघू शकातात. यात फोल्डर हे ट्रि व्हू मध्ये डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला पाच टॅब Size, Top 50, Size Distribution, Modified, आणि Types दिसतात.
5) DiskSavvy:
DiskSavvy हा डिस्क स्पेस अॅनॅलिसिस करण्यासाठी एक पावरफुल टूल आहे जो हार्ड डिस्क च्या वापराचा डिटेल अॅनॅलिसिस करतो. यातील अॅनॅलिसिस बटनवर क्लिक करून जे फोल्डर किंवा फाइल स्कॅन करायचे आहे ते सिलेक्ट करावे.
अॅनॅलिसिस झाल्यानंतर हे अॅप्लिकेशन पाय चार्ट मध्ये डिस्क स्पेस वापराचा रिपोर्ट दाखवते. यात डिफॉल्ट पणे जे फोल्डर डिस्कवर जास्त जागा घेत आहेत ते दर्शविले जातात. वैकल्पीक तुम्ही फाइल टाइप, एक्सटेंशन, फाइल क्रिएशन, माडिफाइड किंवा लास्ट अॅक्ससेस याप्रामणे कस्टमाइज सुध्दा करू शकता. तसचे अनेक फाइल मॅनेजमेंट ऑपरेशन करू शकता.
सौजन्य : ITVISHWA.COM