चांगल्या ‘तांत्रिक’ सवयी
आपण अगदी छोटय़ा स्तरावरदेखील तंत्रज्ञानाचा वापर करत असतो. कधी ते अपरिहार्य असते तर कधी अंगवळणी पडलेलं असतं. पण याचा अर्थ आपण प्रत्चांगल्या ‘तांत्रिक’ सवयी आपण अगदी छोटय़ा स्तरावरदेखील तंत्रज्ञानाचा वापर करत असतो. कधी ते अपरिहार्य असते तर कधी अंगवळणी पडलेलं असतं. पण याचा अर्थ आपण प्रत्येकच वेळी तांत्रिक गोष्टींचं पूर्ण ज्ञान आत्मसात करतो असं नाही. रोजच्या वापरात असूनही कित्येक तांत्रिक बाबींची माहिती आपल्याला नसते व ती असणं आपण महत्त्वाचं देखील मानत नाही. पण ते गरजेचं आहे.
सर्वच गोष्टी महत्त्वाच्या असतात. मात्र आपण त्यांच्या वापराच्या नियमांकडे फारसं लक्ष देत नाही. ज्यामुळे आपलंच नुकसान बरेचदा होत असतं. आज यातील ब-याच उपकरणांमध्ये इंटरनेटही जोडलेलं असतं. त्यासाठीही वापराचे काही नियम आहेत. पण इंटरनेट किंवा संगणक वापरताना अगदी ढिलाईने वापरले जातं.
खरं तर या गोष्टी आपण सतत हाताळत असतो. त्यामुळे ही उपकरणं वापरताना काही चांगल्या सवयी व दक्षता बाळगल्या पाहिजेत. उदा. चार्जिगला लावल्यावर मोबाईल वापरणे टाळावे. कधी-कधी मोबाईलची बॅटरी पूर्ण कमी होऊन मोबाईल पूर्णपणे स्विच ऑफ होऊ द्यावा.
बॅटरी संपत आहे, म्हणून लगेच चार्जिग करू नये. तसेच, संगणक-लॅपटॉप वापरतानाही अशीच काळजी घेतली पाहिजे. संगणक पूर्णपणे शट डाऊन झाल्याशिवाय मुख्य स्विच बंद करू नये. अशा लहान-लहान गोष्टींकडे लक्ष दिल्यास ही उपकरणं वापरताना आपल्याला कोणताही त्रास होणार नाही. एखादी गोष्ट लहानशी वाटली तरी तिच्यापासून होणारं नुकसान किंवा फायदा पाहिला तर ती महत्त्वाची ठरते. अशाच आणखी काही गोष्टी जाणून घेऊ.
वाय-फाय पासवर्ड
तुम्ही जर तुमच्या वायफाय राऊटरने इंटरनेट वापरत असाल तर, त्याचा पासवर्ड हा नेहमी गुप्त ठेवावा. शक्यतो पासवर्ड हा जरा कठीण ठेवावा जेणेकरून कोणालाही आपला पासवर्ड हा लक्षात येता कामा नये. अन्यथा पासवर्ड ओळखून आपल्या वायफायने नेट वापरलं जाऊ शकतं आणि यामुळे तुमचं नुकसान होऊ शकतं. म्हणून वायफायचा पासवर्ड हा नेहमी बदलणं गरजेचं आहे. नंबर, नाव, चिन्हांचा वापर करून पासवर्ड ठेवावा.

त्यामुळे पासवर्ड काय असेल हे कोणाच्या लक्षात येणार नाही. तसेच, आपण मोबाईलवरून हॉटस्पॉट जर कोणाला दिला तर, काम झाल्यावर तो त्वरित बंद करावा. अन्यथा तो हॉटस्पॉट चालू राहील आणि त्यावरून परकी माणसंच नेटसर्फिग करतील. यामुळे तुमच्या नेटचं पॅकेज संपण्याची शक्यता आहे. शक्यतो, मोबाईलच्या हॉटस्पॉटलाही पासवर्ड ठेवल्यास कोणतीही परकी व्यक्ती नेटचा वापर करणार नाही.
महत्त्वाच्या गोष्टी जपून ठेवा
आपण आपल्या संगणकात व मोबाईल फोनमध्ये महत्त्वाच्या अनेक डेटा फाईल ठेवतो. उदा. आपले प्रोजेक्ट, डॉक्युमेंट, महत्त्वाची माहिती तसेच, आपले फोटो, आवडती गाणी व व्हीडिओ हे साठवून ठेवतो. पण कधी जर संगणक किंवा मोबाईल खराब झाला किंवा काही अन्य कारणास्तव आपल्याला संगणक किंवा मोबाईल फॉरमॅट करावा लागतो आणि अशा वेळी जर या फाईल्सची दुसरीकडे साठवणूक केली नसेल तर या फाईल आपल्याला पुन्हा पाहणं अशक्य होते. यासाठी आपल्या महत्त्वाच्या डेटा फाईल्स, डॉक्युमेंट यांचे बॅकअप ठेवणे गरजेचे आहे. म्हणजेच, आपण या फाईल पेन ड्राईव्ह, सीडी किंवा एक्स्टर्नल हार्डडिस्कमध्ये साठवून ठेवल्यास संगणकातील आपल्या या फाईल डिलिट झाल्या किंवा बिघडल्यास आपण दुसरीकडे साठवून ठेवल्यामुळे त्या आपल्याला सहजरित्या पुन्हा उपलब्ध होतात. त्यामुळे संगणकात साठवून ठेवलेल्या महत्त्वाच्या फाईल, डॉक्युमेंटचे बॅकअप घेतल्यास ते आपल्याला फायदेशीर असते.

जलदरित्या संगणक हाताळा
संगणक किंवा लॅपटॉपवर काम करताना आपण फाईल उघडण्यासाठी, डिलिट करण्यासाठी, कॉपी-पेस्ट करण्यासाठी, यासारख्या विविध कामांसाठी आपण माऊसचा वापर करतो. पण जर अशा कामांसाठंी आपण की-बोर्डचा वापर केला तर आपण संगणक व लॅपटॉपवर जलद गतीने व झटपटरित्या काम करू शकतो. त्यासाठी आपल्याला संगणकाच्या शॉर्टकर्ट कीज माहीत असणे गरजेचे आहे. शॉटकर्ट कीज माहीत नसतील तर आपल्याला इंटरनेटवरून शॉटकर्ट कीजचा तक्ता उपलब्ध होऊ शकतो. की-बोर्डचा वापर करून आपण संगणक-लॅपटॉप हाताळला तर, आपण कामे झटपट करू शकतो.

अँटी व्हायरसचा वापर करा
संगणक, लॅपटॉपवर आपल्या अनेक महत्त्वाच्या फाईल असतात. सध्या स्मार्ट फोन व टॅबवरही आपण काम करत असतो. त्यामुळे आपण संगणक किंवा लॅपटॉपला अनेकदा पेन ड्राईव्ह किंवा मोबाईल जोडत असतो. तसेच, सध्या अँड्रॉईड फोन व टॅबला थेट कनेक्ट करू शकतो असेही पेन ड्राईव्ह बाजारात उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे अनेक वेळा आपण पेन ड्राईव्ह मोबाईलला, संगणकाला व लॅपटॉपला सतत कनेक्ट करत असतो. त्यामुळे यामध्ये असलेले व्हायरस आपल्या संगणकात जाऊन संगणकातील आपल्या महत्त्वाच्या फाईल खराब करू शकतात. म्हणून आपला मोबाईल, संगणक, लॅपटॉप सुरक्षित ठेवण्यासाठी त्यामध्ये अँटिव्हायरस इन्स्टॉल केल्यास आपल्या संगणकाला, लॅपटॉपला व मोबाईला कोणत्याही प्रकारचा धोका नसतो व आपल्या सर्व फाईल सुरक्षित राहू शकतात. सध्या अँटिव्हायरस या सुरक्षेबरोबर अनेक सुविधा ग्राहकांना पुरवल्या जातात. त्यामुळे वापरकर्त्यांना याचा चांगला फायदा होऊ शकतो.

पब्लिक वाय-फायमध्ये महत्त्वाची कामे करणे टाळा
अनेक दुकाने, हॉटेल, कॅफे इत्यादी ठिकाणी ग्राहकांसाठी मोफत वाय-फायची सुविधा असते आणि या पब्लिक वाय-फायमध्ये आपण नेट सर्फिंग करत असतो. पण कधी-कधी आपण क्रेडिट व डेबिट कार्डचा वापर करून ऑनलाईन शॉपिंग करतो. तसेच नेट बँकिंग व बँकेची इतर महत्त्वाची कामे करतो. या पब्लिक वाय-फायमध्ये केलेल्या कामाचा रेकॉर्ड मुख्य संगणकामध्ये असतो. त्यामुळे तुमच्या कार्डचा पिन नंबर, तुमच्या अकाऊंटचे पासवर्ड यांसारखी महत्त्वाची माहिती चुकीच्या हाती पडू शकते. तसेच, तोच वाय-फाय वापरणारी दुसरी व्यक्ती ही महत्त्वाची माहिती हॅक करून त्याचा गरवापर करू शकते. म्हणून पब्लिक वाय-फायमध्ये बँकेची व इतर कोणतीही महत्त्वाची कामे करू नयेत. यासाठी आपण पब्लिक वाय-फाय वापरत असताना मोबाईल व संणकामध्ये एस.एस.एल. (सिक्युअर सव्र्हिस लेअर) हा पर्याय चालू ठेवा आणि व्ही.पी.एन. (व्हच्र्युअल प्रायव्हेट नेटवर्क) चा उपयोग करा.

गुगलवर सर्च करतेवेळी
कधीकधी आपण गुगलवर सर्च केल्यावर माहिती उपलब्ध न होता स्क्रिनवर एरर कोड दाखवले जाते. अशा वेळी तो एरर का आला हे जाणून घेण्यासाठी तोच ‘एरर कोड -हाऊ टु फिक्स एरर कोड प्लस एरर कोड’ असं टाईप करा. अथवा एरर मेसेज गुगलवर टाईप करून सर्च करा. तुम्हाला त्याचे योग्य ते उत्तर मिळेल. आपल्याला गुगलवरून कोणत्याही विषयाची अचूक माहिती मिळवायची असेल तर, त्या विषयासंदर्भातील योग्य ते शब्द गुगलवर टाईप करा. समजा, आशा भोसले यांची मराठी गाणी डाऊनलोड करायची असल्यास गुगलवर आशा भोसले मराठी साँग एमपी ३ फ्री डाऊनलोड असे टाईप करा. तुमच्या समोर पेज येईल. जर पहिल्या पेजच्या माहितीवरून समाधानी झाला नसाल तर, दुस-या पेजवर जाऊ शकता. शक्यतो, सुरुवातीला दिसणारे पहिले दोन ते तीन पर्याय जास्त माहिती पुरवणारे असतात. टॅबवर क्लिक करण्याअगोदर त्या लिंकखाली थोडक्यात दिलेली माहिती वाचून योग्य वाटल्यावर क्लिक करा. गुगलवर फोटो, न्यूज, व्हीडिओ यांसारखे पर्यायवर क्लिक केल्यास त्या संदभातील फोटो, व्हीडिओ, न्यूज उपलब्ध होतात.

संगणकाच्या जलद वेगासाठी
अनेकदा आपण फाईल किंवा फोल्डर एका ड्राईव्हमधून दुस-या ड्राईव्हमध्ये कॉपी-पेस्ट करतो किंवा फाईल डिलिट करून पुन्हा रिस्टोअर करतो. यामुळे संगणक-लॅपटॉप धीम्या गतीने काम करतो. तेव्हा आपण संगणकाची हार्ड ड्राईव्ह खराब झाली आहे असं आपण समजतो. परंतु अशा वेळी, संगणकातील डिस्क डिफ्रॅगमेंटेशन या पर्यायावर क्लिक केल्यास तुम्हाला तुमची हाड्र डाईव्ह डिफ्रॅगमेंटेशन करायचे ऑप्शन मिळेल. हाड्र डाईव्ह डिफ्रॅगमेंटेशन झाल्यावर संगणक पुन्हा आपल्या पूर्वीच्या जलद गतीने चालू लागेल.

सर्व खात्यांसाठी एकच ई-मेल आयडी
आपण व्यवसाय व इतर कामासाठी अनेक ई-मेल आयडी वापरतो. जी-मेल, याहू मेल, रेडीफ मेल, हॉट मेल, आऊटलूक इत्यादी ई-मेल आयडीवर आपले अकाऊंट असतात. अशा वेळी या सर्व अकाऊंटचे ई-मेल पाहण्यासाठी संगणकामध्ये सगळे मेल बॉक्स पाहावे लागतात किंवा स्मार्ट फोनमध्ये या ई-मेलचे अॅप घ्यावे लागतात. पण त्यामुळे सर्व अकाऊंट उघडून ई-मेल पाहणे शक्य होत नाही. अनेकदा महत्त्वाचे ई-मेल पाहणे राहून जातात.

म्हणून सर्व अकाऊंटचे मेल एकाच ई-मेल अकाऊंटवर पाहण्याची सोय जी-मेलमध्ये आहे. यासाठी जी-मेलच्या सेटिंगमध्ये अकाऊंट ऑप्शनवर क्लिक करा आणि तिथे तुम्ही आपले इतर ई-मेल अॅड करू शकता. यामुळे इतर ई-मेल आयडीवर येणारे मेल तुम्ही जी-मेलमध्ये म्हणजे एकाच ई-मेल स्क्रिनवर पाहू शकता. इतकंच नाही तर, आपल्याला आलेला मेल हा कोणत्या अकाऊंटमध्ये आला आहे, याचीही माहिती आपल्याला मिळते. यामुळे तुमच्या वेळेची बचतही होते आणि महत्त्वाचे ई-मेलही पाहण्याचे बाकी राहत नाही.
तर अशा अनेक छोटय़ा छोटय़ा बाबी लक्षात ठेवून, त्या प्रत्यक्षात आणल्यास तुमच्या वेळेची तर अवश्य बचत होईलच, शिवाय तुम्हाला कोणत्याही प्रकारचा व्हच्र्युअल विश्वातला धोका उद्भवणार नाही. तेव्हा अशा उपयोगी पडणा-या तांत्रिक सवयी आत्मसात करून घ्या आणि तुम्हीही इतरांसारखे टेक्नॉलॉजी वापरण्यात हुशार व्हा