या ब्लॉगवरील सर्व माहिती इन्टरनेट आणि तंत्रस्नेही शिक्षकांच्या मदतीने संकलित करण्यात आली आहे .......

Sunday, May 15, 2016

२०१५मधले तंत्राविष्कार

सीईएस म्हणजे कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक शो, जो दरवर्षी अमेरिकेतील लास व्हेगासमध्ये भरवला जातो.
तंत्रज्ञानातील नवनवीन कल्पनांवर आधारित उपकरणं, साधनांचे हे अनोखं प्रदर्शन गेली ४० र्वष केवळ ग्राहकच नव्हे तर जगातील मोठमोठया कंपन्या, तंत्रविज्ञानाची आवड असणा-यांचं मोठं आकर्षण बनलं आहे.
या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाला जगभरातून लाखो लोक भेट देतात. दरवर्षी जानेवारी महिन्यात अमेरिकेत भरणारं हे आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रदर्शन असून त्यांचाच एक नवा उपक्रम म्हणून यावर्षीच्या मे महिन्यात पहिल्यांदाच शांघायमध्ये सीईएस आशिया प्रदर्शन भरवलं जाणार आहे.
दरवर्षी या प्रदर्शनात ३६००हून अधिक कंपन्या सहभागी होतात, ज्यात ग्राहकोपयोगी हार्डवेअर तंत्रज्ञान, कॉन्टेट व थेट तांत्रिक उत्पादनांची निर्मिती करणा-या उत्पादक, विकासक व पुरवठादार कंपन्यांचा समावेश असतो. १४० देशांचे प्रतिनिधी इथे भेट देतात.
कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक असोसिएशनतर्फे हे प्रदर्शन भरवलं जातं. थ्रीडी प्रिंट्रिंग, तांत्रिक उपकरणं, ध्वनी आधारित उपकरणं, ऑटोमोटिव्ह इलेक्ट्रॉनिक्स, संपर्काधारीत मूलभूत सुविधांचे तंत्रज्ञान, कॉम्प्युटर हार्डवेअर, सॉफ्टवेअर व इतर सेवांसाठीची उपकरणं, डिजिटल इमेजिंग व फोटोग्राफीची साधनं, इलेक्ट्रॉनिक गेमिंग, फिटनेस आणि स्पोर्ट्स, हेल्थ आणि बायोटेक, इंटरनेट सेवा, ऑनलाईन मीडिया, रोबोटिक्स, सेन्सर्स, स्मार्ट होम, स्टार्टअप्स, व्हीडिओ, वेअरेबल्स व वायरलेस साधनं यांची निर्मिती व उत्पादन करणा-या हजारो कंपन्या त्यांची उत्पादनं या प्रदर्शनात मांडतात.
१९६७च्या जून महिन्यात न्यूयॉर्कमध्ये सीईएस पहिल्यांदा भरवण्यात आलं. त्यानंतर दरवर्षी या प्रदर्शनाला अफाट प्रतिसाद मिळत आलेला आहे. अनेक कंपन्यांनी त्यांची उत्पादनं जगासमोर आणण्यासाठी इथेच पहिल्यांदा मांडली आणि अशाच काही साधनं व उपकरणांनी आपलं जीवन
आमूलाग्र बदलून टाकलं. त्यापैकीच ही काही..
» १९७० व्हीडिओ कॅसेट रेकॉर्डर
» १९७४ लेसर डिस्क प्लेयर
» १९८१ कॅमकॉर्डर, सीडी प्लेयर
» १९९० डिजिटल ऑडिओ टेक्नॉलॉजी
» १९९३ मिनी डिस्क, रेडिओ डेटा सिस्टम
» १९९४ डिजिटल सॅटेलाईट सिस्टम
» १९९६ डीव्हीडी
» १९९८ एचडीटीव्ही
» १९९९ हार्ड डिस्क व्हीसीआर ( पीव्हीआर)
» २००० डिजिटल ऑडिओ रेडिओ
» २००१ मायक्रोसॉफ्ट एक्सबॉक्स, प्लाझ्मा टीव्ही
» २००३ एचडी रेडिओ, ब्ल्यू रे डीव्हिडी
» २००५ आयपी टीव्ही
अ‍ॅपल वॉच
अ‍ॅपल वॉचची जगभरातील अ‍ॅपल उत्पादनांचे सच्चे चाहते आतुरतेने वाट पाहतायत. विविध अ‍ॅप्लिकेशन्सनी भरलेले हे घडय़ाळ एक आरोग्य आणि तंदुरुस्तीसाठीचे साधन आहे. जे तीन प्रकारात उपलब्ध असेल. मात्र हे खूप महागडं असेल त्यामुळे याला बाजारात किती प्रतिसाद मिळेल, याबद्दल साशंकताच आहे.
फिटबिट सर्ज आणि चार्ज
हे अजून एक आरोग्य आणि तंदुरुस्तीसाठीचे तांत्रिक उपकरण आहे, जे तुमच्या तब्येतीवर लक्ष ठेवण्यासाठी मदत करते. तसंच यात जीपीएस ट्रॅकर, कॉलर आयडी व संगीत ऐकण्याचीही सोय असेल.
skully helmetस्कली मोटरसायकल हेल्मेट
अनोखं असं हे हेल्मेट गॅजेटप्रेमी ग्राहकांना भुरळ घालेल असंच आहे. यात गुगल ग्लाससारखी सुविधा आहे शिवाय १८० कोनातून दृश्य दाखवणारा कॅमेरा व जीपीएस मार्गदर्शकही आहे. याखेरीज यात फोन व संगीताचीही सुविधा आहे. मात्र सध्यातरी हे महागडे आहे.
एसएमएस ऑडिओ बायोस्पोर्ट इअरबड्स
हे हायएंड इअरबड्स खास आरोग्याला जपणा-या लोकांसाठी आहेत. यातील बायोमेट्रिक सेन्सरमुळे तुमच्या नाडीच्या ठोक्यांपासून ते अगदी हृदयाच्या ठोक्यापर्यंतची सर्व माहिती यात जमा केली जाते व ती तुम्ही तुमच्या फोनमध्येही साठवू शकता. शिवाय हे जलप्रतिरोधकही आहेत.
पेबल टाईम
अ‍ॅपल वॉचला टक्कर देण्यासाठी पेबल कंपनीने त्यांचे घडय़ाळ प्रस्तुत केले आहे. रंगीत स्क्रीन, पातळ बॉडी व आयफोनसारखी मायक्रोफोनची सुविधा असे कितीतरी फिचर्स यात आहेत. यात  ६५०० पेक्षा जास्त अ‍ॅप्स भरता येतील.
Digitsoleडिजिटसोल
आता शरीराची माहिती घेण्यासाठी हातातच घडय़ाळ बांधावं अशी गरज उरणार नाही कारण या डिजिटसोलमुळे पायात हे उपकरण घालून देखील माहिती जमा करता येईल. हे शूजमध्ये घालायचे सोल आहेत. जे तळव्यांना गरम ठेवतात व कॅलरीची वगरे माहिती देतात. यात डेटा ट्रान्सफर करण्यासाठी ब्ल्यूटूथचीही सोय आहे तसंच पावलांना धक्के लागू नयेत म्हणून अतिरिक्त पॅडिंग देखील आहे.
Quellक्वेल
कोणत्याही औषधाविना बरं व्हायचं असेल तर हे उपकरण फायदेशीर ठरू शकतं. हे अनोखं उपकरण गुडघ्याला बांधल्यावर ते गुडघ्यामधील काही नसांना उत्तेजित करतं व त्यामुळे मेंदूकडे वेदना कमी करण्यासाठीचा संदेश पोहोचवला जातो. अशा प्रकारे तुमची कोणतीही वेदना कमी होते.
FITGuard
फिटगार्ड
फुटबॉल किंवा क्रिकेट खेळाडू किंवा रेसिंग कारचे स्पर्धक यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त असं हे उपकरण यावेळच्या प्रदर्शनात दिसलं. हे तोंडावर लावायचं उपकरण असून डोक्याला किंवा चेह-याला कोणतीही इजा अथवा गंभीर दुखापत झाली तर या उपकरणातून आवाज व प्रकाश बाहेर पडून जवळच्या लोकांना सूचना मिळते. आपल्या मोबाईलमध्ये एसओएस संदेश पाठवायची जी योजना असते तीच यात काम करते.