या ब्लॉगवरील सर्व माहिती इन्टरनेट आणि तंत्रस्नेही शिक्षकांच्या मदतीने संकलित करण्यात आली आहे .......

Monday, November 27, 2017

आता Whatsapp मुळे कळेल तुमच्या मित्रांचे लाईव्ह लोकेशन,

https://i9.dainikbhaskar.com/thumbnails/600x519/web2images/divyamarathi.bhaskar.com/2017/10/18/2_1508321342.jpg


Whatsappने आता नवे फीचर सादर केले आहे. या फीचरच्या मदतीने युजर्सला रिअल टाईम लोकेशनमध्ये ट्रॅक करता येणार आहे. ज्यांच्या स्मार्टफोनवर व्हाट्स अॅप असून दोन्ही युजर्सच्या मोबाईलमध्ये एकमेकांचा क्रमांक सेव असेल तरच लोकेशन ट्रॅक करता येणार आहे. हे फीचर अँड्रॉईड आणि आयओएस या दोन्ही व्हर्जनवर वापरता येणार आहे. Show my friends या ऑप्शवर जा...
- असे काम करेल हे फीचर?
- हे फीचर बीटा व्हर्जनवर व्हाट्सअॅप अपडेट केल्यानंतर लगेचच दिसेल. हे फीचर वापरण्याकरिता इनेबल ऑप्शनचा पर्याय निवडावा लागेल.
- हा पर्याय अॅक्टीवेट करण्यासाठी व्हाट्सअॅप ग्रुपच्या सेटींगमधून शो माय फ्रेंडसमध्ये जावे लागेल. त्यानंतर तुम्ही कोणत्याही मित्रासोबत तुमचे लोकेशन शेअर करू शकता.
- याठिकाणी तुम्ही युजर्सला लाईव्ह लोकेशन शेअर करतांना टाईम स्लॉटही निवडू शकता. यात एक मिनिटांपासून पुढे टाईम सेट करू शकता.
- लाईव्ह लोकेशन हे फीचर सिंग किंवा ग्रुप दोन्ही पर्यायांमध्ये उपलब्ध असेल.
- युजर्स आपले रिअल लोकेशनचा ऑप्शन डिअॅक्टीवेटही करू शकणार आहे. त्यासाठी त्यांना स्टॉप शेअरींग या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
- लोकेशनचा मॅसेज होईल सेंड
- युजर्स जेव्हा पर्सनल अथवा ग्रुप चॅटवर आपले लोकेशन शेअर करेल तेव्हा त्याला एक मॅसेज सेंड करावा लागेल. मॅसेज वाचण्यासाठी रिकॉलचाही पर्याय उपलब्ध असेल.
- युजर्स हा मॅसेज एडिटही करू शकतील. मात्र, एडिट करण्यापूर्वी तो मॅसेज कोणीही वाचलेला नसावा. जर मॅसेज एडिट झाला नाही तर तो मॅसेज वाचलेला आहे, असे समजावे.
- व्हाट्सअॅपचे हे फीचर एंड टू एंड एन्क्रिप्शन पॉलिसीसह आहे. त्यामुळे तुमचे लोकेशन तुमच्या परवानगीशिवाय पाहता येणार नाही.