या ब्लॉगवरील सर्व माहिती इन्टरनेट आणि तंत्रस्नेही शिक्षकांच्या मदतीने संकलित करण्यात आली आहे .......

Monday, July 17, 2017

आवाजावरून आरोग्य परीक्षण !

कोणत्याही प्रकारच्या चाचणीचा वापर न करता केवळ कुणाच्याही आवाजाचे विश्‍लेषण करून त्या व्यक्तीचे आरोग्य परिक्षण करणारे स्मार्टफोन ऍप्लीकेशन तयार करण्यात आले आहे.
kijjini
आपल्याला कोणताही विकार झाल्यास याचे निदान करण्यासाठी विविध चाचण्या करणे आवश्यक असते. या चाचण्यांमधूनच आपल्याला नेमका कोणता विकार झालाय याची माहिती मिळू शकते. अर्थात एखाद्या व्यक्तीच्या आवाजाचे एका स्मार्टफोन ऍप्लीकेशनद्वारे सखोल विश्‍लेषण करून त्याच्या विकारांची माहिती मिळू शकते यावर आपण विश्‍वास ठेवणार नाही. मात्र या प्रकारचे अनोखे ऍप्लीकेशन तयार करण्यात आले आहे.
‘किजिनी’ या नावाने संबंधीत ऍप्लीकेशन विकसित करण्यात आले आहे. खरं तर याच्या नावामागेही संकेत आहे. हा शब्द ‘कि’ आणि ‘जिनी’ पासून तयार करण्यात आला आहे. यातील ‘कि’ हा शब्द प्राचीन ‘ची’ अर्थात उर्जा शब्दाचा पर्याय आहे तर ‘जिनी’ म्हणजे चमत्कार करणारा व्यक्ती असा आहे. याचाच अर्थ असा की, ‘किजिनी’ म्हणजे उर्जेतून होणारा चमत्कार होय. ‘किजिनी’ला तयार करणार्‍यांनी ‘इंडिगोगो’ या क्राऊडफंडिंग करणार्‍या वेबसाईटवरून भांडवल जमा करण्यासाठी मोहीम सुरू केली आहे. यावर या ऍपबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
आवाज हा आपल्या शरीराचा आरसा असल्याचे मानले जाते. कोणतीही व्याधी असतांना आपला आवाज वेगळा असतो, आनंदात वेगळा तर दु:खातही वेगळा. नेमकी हीच बाब लक्षात घेत तंत्रज्ञांनी बायो-ऍकॉस्टीक या तंत्रज्ञानाच्या मदतीने ‘किजीनी’ हे कुणाच्याही शरीरात असणार्‍या व्याधींचे निदान करू शकते. हे ऍप वापरण्यासाठी अत्यंत सुलभ आहे. याचा वापर करण्यासाठी कोणत्याही स्मार्टफोनमधील मायक्रोफोनचा उपयोग करून सुमारे तीस सेकंदाचे रेकॉर्डींग करणे आवश्यक आहे. यानंतर आवाजाचे सखोल विश्‍लेषण करून संबंधीताचे व्यक्तीमत्व, त्याला आवश्यक असणारे पोषण (न्युट्रीशन), त्याच्या स्नायूंची माहिती, त्याला आवश्यक असणारे न्युरोडायट, त्याच्या शरीरातील विकार आदींची माहिती काही क्षणात या ऍप्लीकेशनवर मिळू शकते. लवकरच अँड्रॉईड, आयओएस आदींसह अन्य ऑपरेटींग प्रणालीवर याचे ऍप्लीकेशन्स सादर होणार आहेत. ‘इंडिगोगो’तून मिळणार्‍या भांडवलाचा उपयोग करून याच स्वरूपाचे (ध्वनीचे विश्‍लेषण करणारे) वैविध्यपुर्ण ऍप्स तयार करण्यात येणार आहेत.