या ब्लॉगवरील सर्व माहिती इन्टरनेट आणि तंत्रस्नेही शिक्षकांच्या मदतीने संकलित करण्यात आली आहे .......

Friday, February 24, 2017

हि आहेत data लवकर संपण्याची कारणे.......

हि आहेत data लवकर संपण्याची कारणे.......



1. रिस्ट्रिक्ट बैकग्राउंड डाटा : एंड्रॉयड फोन मध्ये अनेक एप्लिकेशन असतात जे बैकग्राउंड ला देखील चालू असतात.आणि हेच एप्लिकेशन जास्त प्रमाणात डाटा वापरतात.अशा वेळी तुम्ही बैकग्राउंड डाटा रिस्ट्रिक्ट करू शकता. ज्यामुळे तुम्ही जेव्हा एप्लिकेशन सुरु कराल तेव्हाच डाटा वापरला जाईल अन्यथा बंद राहील.
बैकग्राउंड डाटा रिस्ट्रिक्ट हा ऑप्शन सेटिंग मध्ये डाटा यूसेज मध्ये असतो.

2. मैनुअल एप्स अपडेट : एंड्रॉयड स्मार्टफोन मध्ये बाय डिफॉल्ट एप ऑटो अपडेट मोड वर असतात. ऑटो अपडेट बंद करून ते  मैनुअल अपडेट वर ठेवा. ज्या एप चा वापर आपण नियमित करतो त्यांनाच अपडेट करा.ऑटो अपडेट ऑप्शन गूगल प्ले स्टोर च्या सेटिंग मध्ये असतो.
3. कमी रेजल्यूशन चे वीडियो : ऑनलाइन वीडियो पहाताना वीडियो चे रेजल्यूशन जास्त असेल म्हणजेच  वीडियो एचडी रेजल्यूशन चा असेल तर जास्त डाटा वापरला जातो. यासाठी एप ची सेटिंग  एचडी वीडियो साठी वायफाय वर सेट करू शकता.ज्यामुळे मोबाइल डाटा द्वारे वीडियो स्ट्रीम केल्यावर कमी रेजल्यूशनचे  वीडियो दिसतील.हीच सुविधा यूट्यूब मध्ये देखल आहे.अनेक ब्राउजरमध्ये देखील इमेज आणि वीडियो कमी रेजल्यूशन वर सेट करण्याचा पर्याय दिलेला आहे. 
4. लाइट app :  अनेक एपचे आज लाइट वर्जन उपलब्ध आहेत. हे एप खूप कमी प्रमाणात डाटा वापरतात. जसे  फेसबुक लाइट आणि फेसबुक मैसेंजर लाइट इत्यादि। यांचा वापर करून आपण डाटा वाचवू शकता .

5. वेबएप कॉलिंग  : बर्याचदा आपण सामान्य कॉलिंग ऐवजी वेब कॉलिंग करतो. ही  कॉलिंग सेवा जास्त डाटा वापरतात.अशा वेळी आपण सामान्य कॉलिंग केल्यास बर्याच अंशी फरक जाणवतो.