‘स्वतःच स्वतःचा फोटो घेणे’ याला ‘सेल्फी’ असे म्हणतात. सेल्फी घेण्याची पद्धत ही तशी काही नवीन नाही. पण स्मार्टफोनमध्ये फ्रंट कॅमेरॅचा समावेश झाल्यापासून सेल्फी हा प्रकार खर्या अर्थाने सर्वत्र प्रचलित झाला. स्मार्टफोनच्या माध्यमातून फोटो घेण्यासाठी एका हातात फोन पकडावा लागतो आणि दुसर्या हाताने स्क्रिनला स्पर्श करावा लागतो. त्यामुळे अशा पद्धतीने सेल्फी घेणे खरं तर अवघड आहे. यावर उपाय म्हणून असे काही अनुप्रयोग वापरले जातात, जे ‘व्हॉल्युम की’च्या सहाय्याने सेल्फी घेण्याची सोय करुन देतात. अशाप्रकारे सेल्फी काढत असताना ज्या हातात फोन पकडला आहे, त्याच हाताचा आंगठा किंवा बोट वापरुन सेल्फी काढता येतो व त्यामुळे एक हात मोकळा राहतो. पण याहूनही अधिक सोप्या पद्धतीने सेल्फी काढायचा असेल, तर अशा अनुप्रयोगाचा वापर करवा जो केवळ शिट्टीचा आवाज ओळखून सेल्फी काढू शकतो.
व्हिसल कॅमेरा – सहजतेने सेल्फी काढा

आपल्याला जर शिट्टी वाजवता येत नसेल, तर या अनुप्रयोगाच्या पर्यायांमधून Sensitivity Level १ ठेवावी, आणि त्यानंतर केवळ शिट्टीसारखा आवाज काढण्याचा प्रयत्न करा. अशाने आपला सेल्फी काढला जाईल. शेवटी नाहीच जमले, तर सेल्फी काढण्यासाठी ‘व्हिल्युम की’चा देखील वापर करता येतो.
marathiinternet.in