या ब्लॉगवरील सर्व माहिती इन्टरनेट आणि तंत्रस्नेही शिक्षकांच्या मदतीने संकलित करण्यात आली आहे .......

Monday, June 13, 2016

ऑफलाईन वापरा मॅप्स

google-mapsगुगलने स्मार्टफोनधारकांसाठी मॅप्सची सुविधा ऑफलाईनही देऊ केली आहे. यामुळे आता भविष्यात आपण इंटरनेटच्या जोडणीविनाही याचा लाभ घेऊ शकतो.


गुगल मॅप्स हे जगभरात अत्यंत लोकप्रिय आहेत. यातीलस्ट्रीट व्ह्यूसारख्या सुविधा तर अत्यंत चित्ताकर्षक अशा आहेत. मात्र माहिती आणि मनोरंजनासाठीच नव्हे तर मॅप्सचा उपयोग प्रामुख्याने नेव्हिगेशनसाठी होत असतो. पर्यटक प्रवाशी याचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. यानुसार गुगलने अलीकडच्या काळात यात नवनवीन सुविधा प्रदान केल्या आहेत. अगदी काही दिवसांपुर्वीच गुगलने मॅप्सवर रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक देण्याची घोषणा केली आहे. एका अर्थानेवाटाड्याम्हणून गुगल मॅप्स अत्यंत उपयुक्त ठरत आहे. मात्र याला मर्यादादेखील होत्या. एक तरवाय-फायवा इंटरनेट डाटाची सुविधा नसल्यास मॅप्स काम करत नव्हते. परिणामी दुर्गम भागात स्मार्टफोन असूनही याचा वापर करणे अशक्य होते.
या पार्श्वभुमिवर आता मॅप्स ऑफलाईनदेखील वापरता येणार असल्याची घोषणा गुगलच्या आय/ परिषदेत करण्यात आली आहे. म्हणजे इंटरनेटची सुविधा नसणार्या भागातही यातील सर्व सुविधा वापरता येतील. याचा पर्यटकांना मोठ्या प्रमाणात लाभ होण्याची शक्यता आहे. या वर्षाच्या अखेरीसपर्यंत मॅप्सच्या सर्व प्रणालींवरील ऍप्लीकेशनमध्ये याचे अपडेटस् देण्यात येईल असे गुगलतर्फे जाहीर करण्यात आले आहे.


by: shekhar patil