आजही जेव्हा आपण एखादा नवीन गोष्ट पाहतो तेव्हा, अरेच्च्या! असेही होते असे बोलतो आणि ती गोष्ट दाखविणारा आपणास त्यात काय? अशी फुशारकी मारतो. मग त्याच्या समोर आपण किती अडाणी आहोत असे आपणास वाटू लागते. हे मान्य आहे की आहे की एखादी नवीन गोष्ट पाहिल्यास आश्चर्यचकित व्हायला होते, पण दरवेळेस कुठलीही नवीन गोष्ट दुसर्यानेच आपल्याला दाखवायला हवी हे मात्र आपणास बदलता येईल. शोधल्यास सर्व सापडते हे तर तुम्हालाही मान्य असेल, मग काय शोधायचे हाच मोठा प्रश्न असतो. पण जर काय शोधायचे हे माहीत असेल तर मग शोधण्यासाठी त्याची तुम्ही एवढे दिवस थांबलात का असा प्रश्न तुम्हाला स्वतःला विचारावा लागेल. असो. इथे आता हा प्रश्न आहे की काय शोधायचे आणि कुठे सापडेल? या दोन्ही गोष्टींचे उत्तर अगदी सोपे आहे. थोडावेळ असा विचार करा की कुठली गोष्ट असू शकत नाही आणि ती गोष्ट आठविल्यास त्याची माहिती गुगल.कॉमवर शोधायची. तुम्हाला असे वाटेल की हे सहज सोपे नाही. पण खरंच हे शक्य आहे. इथे काही कॉम्प्युटरमधील काही अशा प्रोग्रॅमची ओळख दिली आहे, जे प्रोग्रॅम तुम्ही कधी विचार देखिल केले नसतील. इतकेच की या प्रोग्रॅमबद्दल जास्त कुणाला माहिती देखिल नसते. जर तुम्ही शोधलात तर तुम्हाला नक्कीच सापडतील तसेच हे प्रोग्रॅम शोधता-शोधता अशाच निरनिराळ्या प्रोग्रॅमबद्दल तुम्हाला कल्पना यावी या विचाराने इथे सांगितलेला प्रोग्रॅम कुठे मिळेल याची काहीच माहिती दिली नाही आहे. टीप : एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी ती म्हणजे इथे सांगितलेला प्रोग्रॅम कुठे मिळेल याची काहीच माहिती दिली नसल्याने तसा अथवा तशा स्वरूपाचा प्रोग्रॅम आपणास एखाद्या वेबसाइटवर आढळल्यास तो डाउनलोड करण्यापूर्वी त्याची संपूर्ण माहिती वाचून घ्या तसेच त्या प्रोग्रॅम/सॉफ्टवेअर बद्दल इतर वेबसाइटवर कुणी त्याबद्दलचा अनुभव दिल्या असल्यास तो वाचूनच मग निर्णय घ्यावा. शक्यतो डाउनलोड.कॉम वरून कुठलाही सॉफ्टवेअर डाउनलोड करावा जेणे करून व्हायरसचा त्रास होणार नाही. डाउनलोड.कॉमवरुन एखाचे चांगले सॉफ्टवेअर शोधून डाउनलोड कसे करावे हे पाहण्यासाठी इथे क्लिक करा. |
|---|