या ब्लॉगवरील सर्व माहिती इन्टरनेट आणि तंत्रस्नेही शिक्षकांच्या मदतीने संकलित करण्यात आली आहे .......

Wednesday, December 28, 2016

जीआयएफ निर्मितीसाठी अ‍ॅप

जिफीकॅटने अँड्रॉईड प्रणालीसाठी अ‍ॅप सादर केले असून याच्या मदतीने कुणीही व्हिडीओजपासून जीआयएफ अ‍ॅनिमेटेड प्रतिमा निर्मित करू शकणार आहे.
जिफीकॅटने गुगल प्ले स्टोअरवर ‘जिफीकॅट लूप अ‍ॅप’ सादर केले आहे. हे मोफत अ‍ॅप असून कुणीही याच्या मदतीने कोणत्याही लूप व्हिडीओपासून जीआयएफ प्रतिमा तयार करू शकणार आहे. विशेष म्हणजे कोणत्याही जीआयएफ फाईलपेक्षा यात २० पटीने अधिक उत्तम रितीने प्रतिमा निर्मित होणार असल्याचा दावा जीफीकॅटने केला आहे. ही प्रतिमा कंपनीच्या क्लाऊड स्टोअरेजवर सेव्ह करण्यात येतील. तसेच या प्रतिमेला फेसबुक, ट्विटर, व्हाटसअ‍ॅप आदी सोशल साईटसह ई-मेलवरूनही शेअर करता येणार आहे.