नवी दिल्ली-
नवी दिल्ली- व्हॉट्सअॅप आणि फेसबुकच्या मेसेंजरशी स्पर्धा करण्यासाठी गुगलने ‘अल्लो’ हा मेसेजिंग अॅप बाजारात आणला आहे. हे अॅप अॅँड्रॉईड व आयओएसवर उपलब्ध केला आहे. गुगल समूहाचे उत्पादन व्यवस्थापक अमित फुले यांनी सांगितले की, हे मेसेजिंग अॅप कृत्रिम हुशारीने भरलेले आहे.
यात फोटो, इमोजी, स्टीकर्स. हिंग्लिश भाषा, २०० स्टीकर्स आदींचा त्यात भरणा आहे. गुगल अल्लोमधील सर्व चॅट्स पूर्णपणे सुरक्षित आहेत.
प्ले-स्टोरवर आणि अॅपलच्या अॅप स्टोरवरून हे अॅप डाउनलोड करता येणार आहे. या अॅपमध्ये युझर्सला अनेक नवीन फिचर्स देण्यात आले आहेत.
गुगलच्या या नव्या अॅपमध्ये कोणतेही साईन इन करण्याची गरज नाही. व्हॉट्स अॅपप्रमाणे मोबाईल नंबरच्या साह्याने हे अॅप वापरता येऊ शकते.
‘अल्लो’ अॅप मध्ये देण्यात आलेले नवीन फिचर्स
» या अॅपद्वारे युझर्स त्वरित उत्तर देता येणार आहे. त्यासाठी या अॅपमध्ये अनेक नवीन आयडिया देण्यात आल्या आहेत.
» या अॅपमध्ये असिस्टंट हे फिचर देण्यात आले आहे. याच्यावर क्लिक केल्यावर conversion ओपन होईल. यामध्ये याद्वारे थेट गुगल चॅट बॉटसोबत चर्चा करू शकता. यामध्ये अनेक कॅटेगरी देण्यात आल्या आहेत.
» या अॅपमध्ये टेक्स आणि इमोजी हवे तितके मोठे करता येतात.फोटो सुद्धा एडिट करता येतो. याशिवाय गुगलने 25 प्रसिद्ध कलाकारांसोबत मिळून २५ कस्टम स्टिकर्स बनवले आहेत तेही तुम्ही वापरू शकता.
» जर तुम्हाला प्रायवसी हवी असेल तर ‘अल्लो’ अॅप मध्ये इनकॉग्निटो मोड देखील देण्यात आला आहे.