या ब्लॉगवरील सर्व माहिती इन्टरनेट आणि तंत्रस्नेही शिक्षकांच्या मदतीने संकलित करण्यात आली आहे .......

Monday, August 29, 2016

शाओमीचा पहिला लॅपटॉप Mi नोटबुक लाँच

शाओमीचा पहिला लॅपटॉप Mi नोटबुक लाँच
 शाओमीने आज आपला पहिला लॅपटॉप Mi नोटबुक एअर लाँच केला आहे. हा लॅपटॉप मेटल बॉडीचा असून कंपनीने याला अॅपलचा अल्ट्रापोर्टेबल लॅपटॉप मॅकबुक एअरला लक्ष करून बनवलेला आहे. यासोबतच शाओमीने आपला बहुप्रतिक्षित स्मार्टफोन शाओमी रेडमी प्रो देखील लाँच केला आहे. कंपनीने हा लॅपटॉप दोन मॉडेलमध्ये लाँच केलेला आङे. याचा डिस्प्ले 12.5 इंच असून किंमत 35,300 रुपये आहे. तर दुसऱ्या मॉडेलच्य लॅपटॉपमध्ये 13.3 इंचाचा फुल एचडी डिस्प्ले असून त्याची किंमत 51,400 रुपये देण्यात आली आहे.

अॅपल मॅकबुक एअरची जाडी 17mm असून Mi नोटबुकची जाडी 13.3इंचाच्या लॅपटॉपची जाडी 14.8 mm असल्याचा दावा कंपनीने केला आहे. 13.3 इंचाचा Mi नोटबुक एअर 6th जनरेशनच्या इंटेल कोअर i5 प्रोसेसरवर काम करतो. याच्यासोबतच नवीडिया जीफोर्स 940MX GPU सहित 1जीबीची GDDR5V रॅम आहे. आणि 8जीबी DDR4च्या रॅमसोबत 256 जीबी PCle SSD आहे. शाओमीने या लॅपटॉपचा बॅटरी बॅकअप 10 तास असल्याचा दावा केला आहे. याशिवाय 30 मिनिटांत याची बॅटरी 50% चार्ज होत असल्याचा दावाही कंपनीने केला आहे.

12.5 इंचाचा डिस्प्ले असलेल्या Mi नोटबुकची एअर जाडी 12.9mm आहे. तसेच याचे वजन 1.07 किलोग्रॅम आहे .फुल एचडी डिस्प्लेसोबत हा इंटेल कोर M3 प्रोसेसरला सपोर्ट करतो. यामध्ये 4 जीबी रॅम आहे. तसेच कंपनीने 12 तासाचा बॅटरी बॅकअप असल्याचे सांगितले आहे.

शाओमीने आपल्या या नव्या लॅपटॉपमध्ये लॅमिनेटेड डिस्प्लेच्या प्रकाशाला कमी करून लॅपटॉपला एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत विशेष प्रोटेक्शन दिले आहे. Mi नोटबुक एअर लॅपटॉपमध्ये डॉल्बी साऊंड सपोर्ट करतो. शाओमीने या दोन्ही लॅपटॉपमध्ये Mi क्लॉउड फिचरही दिले आहे. ज्यामाध्यमातून फोन नंबर, मॅसेज, गॅलेरी, नोटस आणि आवश्यक डाटा आदी सेफ ठेवणे सोपे आहे. यासोबतच या दोन्ही लॅपटॉपमध्ये HDMi पोर्टच्या व्यतिरिक्त दोन USB पोर्टस आहेत. तसेच हेडफोनसाठी 3.5mm जॅक देण्यात आले आहेत.