या ब्लॉगवरील सर्व माहिती इन्टरनेट आणि तंत्रस्नेही शिक्षकांच्या मदतीने संकलित करण्यात आली आहे .......

Tuesday, June 28, 2016

अॅण्ड्रॉइड लॉलीपॉप टिप्स आणि ट्रिक्स – जे तुम्हाला एका पॉवर युझर मध्ये बदलवतील

अॅण्ड्रॉइड लॉलीपॉप हा आता हजारो डिव्हाइसेस मध्ये उपलब्ध झाला आहे. लॉलीपॉपAndroid_Lollipop Tips and Tricks मध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत जसे मटेरियल डिझाइन, इंटरफेस आणि याच्या परफॉरमंन्स मध्ये सुधारणा. अॅण्ड्राइड लॉलीपॉप मध्ये युझरसाठी एक्सप्लोर करण्यासाठी अनेक नवीन वैशिष्टयांचा समावेश करण्यात आला आहे. यातील काही तुम्हाला माहित असतील, तर काहींबददल तुम्ही अजून अजाण असाल. येथे अॅण्ड्रॉइड लॉलीपॉपच्या काही टिप्स्आणि ट्रिक्स आहेत जे तुम्हाला पुर्ण क्षमतेने मोबाईलचा वापर करायला शिकवतील. पण एक लक्षात ठेवा मोबाइलच्या मॅन्यूफॅक्चर्स नूसार मोबाइल्मधील काही फंक्शन थोडे वेगळे असू शकतात.

1) Access Quick Settings:
वारंवार वापरल्या जाणा-या सेटिंग्ज तुम्ही फक्त स्क्रीन वरून खAndroid Quick Settingाली दोन स्वाइपने मिळवू शकता. यात like flashlight, hotspot, screen rotation आणि cast screen controls यांचा समावेश आहे. तसेच येथून तुम्ही Wi-Fi, Bluetooth आणि location ऑन/ऑफ करू शकता आणि वेगवेगळया कंडीशनमध्ये मॅन्यूअली ब्राइटनेस सुध्दा अॅडजेस्ट करू शकता.अॅण्ड्रॉइड लॉलीपॉप मध्ये quick setting अॅक्सेस करण्याकरीता, पहिला स्वाइप notification आणतो आणि दुसरा quick setting ला. पण जर तुम्हाला सरळ quick setting मध्ये जायचे असेल तर स्क्रीनला एका बोटाऐवजी दोन बोटांनी स्वाइप करा.



Android Notification


2) Deal with Notification:
स्क्रीन वरून खाली स्वाइप केली असता notification पॅनल ओपन होते. नोटीफीकेशन हे स्क्रीनच्या मध्यभागी दिसतात या नोटीफीकेशनवर टॅप केले असता संबंधीत अॅप्स ओपन होते. जर तुम्हाला या नोटीफीकेशन नको असतील तर तुम्ही संवेदनशील नोटीफीकेशन हाइड करू शकता यासाठी Setting --> Notification manager --> When device is locked --> don’t show notification सिलेक्ट करा.


3) Set up priority mode:
आता ते दिवसAndroid Prirority mode गेले जेव्हा नको त्यावेळी संतप्त करण्या-या नोटीफीकेशन किंवा अलर्ट ने तुमच्या शांततेचा भंग होत होता. गूगलने Do Not Disturb चे एक वैशिष्ट्य लॉलीपॉप मध्ये समाविष्ट केलेले आहे, जे 'Interruptions' या नावाने ओळखले जाते. तुम्ही तुमच्या गरजेच्या प्राधान्य नुसार मोड सेट करू शकता आणि तुमच्या कामाचा किंवा आरामाचा आनंद घेऊ शकता.Interruptions सेटींग अॅक्सेस करण्यासाठी व्हॉल्यूम कि अप किंवा डाउन प्रेस करा. येथे तीन मोड दिसतील -
None- हा ऑप्शन निवडल्यास सर्व नोटीफीकेशन डिसॅबल होतील अगदी अलार्म सुध्दा.
Priority -  तुम्ही कस्टमाइज केलेल्याच नोटीफीकेशन दिसतील (कस्टमाइज करण्यासाठी Priority interruptions only समोरील गियर आयकॉनला टॅप करा)
All – सर्व नोटीफीकेश्न एनॅबल होतील.


Battery Save Mode
4) Enable Battery Saver Mode:
अॅण्ड्रॉइड लॉलीपॉप हा बॅटरी सेव्हर मोडमध्ये बॅटरीचे आयुष्य 90 मिनीटांनी वाढविण्याचे आश्वासन देतो. Battery Saver Mode इनॅबल करण्यासाठी Settings --> Battery --> Battery Mode --> Power Save सिलेक्ट करा.तसेच बॅटरी सेटिंग मध्ये मोबाईल पुन्हा चार्ज करण्यापूर्वी अंदाजे किती वेळ शिल्लक राहिला आहे हे दाखवितो तसेच डिव्हाइस चार्जींगसाठी लावला जातो तेव्हा तो पुर्णपणे चार्ज होण्यासाठी किती वेळ लागेल हे देखील दर्शवितो.

5) Quickly check your data usage and Set Data Limit:
Quick SettingsCelluler Data मेनू मधील या एका वेगळया वैशिष्टयाने तुम्ही तात्काळ डाटाचा वापर बघू शकता. यासाठी फक्त Quick Settings मधील नेटवर्क आयकॉन वर टॅप करा. बस्स्इसतेच!
जर तुमच्या कडे लिमिटेड डेटा प्लान असेल तर, कोणीही आपल्Data Usesया डेटाची मर्यादा ओलांडू इच्छिणार नाही. यासाठी लॉलीपॉपमध्ये मोबाइल मधील डेटा वापरावर बंधन घालता येते. यासाठी Quick Settings मधील cell data आयकॉन वर टॅप करून आणि More settings वर टॅप करा.






6) Add Trusted Devices:
जर तुम्ही वारंवार स्मार्टवॉच सारखी इतर डिव्हाइसेस मोबाइल सोबत कनेक्ट करत असाल तर या डिव्हाइसेससाठी Bluetooth किंवा NFC टॅगला Trusted Device म्हणून सेट करता येते. याचा अर्थ असा होतो कि जेव्हा हे डिव्हाइस रेज मध्ये येतील तेव्हा यांना अनलॉक करण्यासाठी कोणत्याही पासकोड किंवा पॅटर्न लॉकची आवश्यक्ता भासणार नाही. Trusted Device म्हणून अॅड करण्यासाठी Settings -> Security -> Smart Lock मध्ये जा. येथे तुम्ही कोणतेही ब्ल्यूटूथ डिव्हाइस किंवा NFC सेट करू शकाल.






7) Add a New User or Guest Account:
जर तुम्हाला तAndroid Userुमचा फोन इतरांसोबत शेअर करतांना संकोच वाटत असेल तर तुमचा अॅण्ड्राइड लॉलीपॉप गेस्ट युझर मोड मध्ये काही रिस्ट्रीक्शन सोबत किंवा मंल्टीपल युझर अकाउंट मध्ये कोणतेही रिस्ट्रीक्शन न ठेवता शेअर करू शकता.युझर तयार करण्यासाठी होम स्कीन वरून नोटीफीकेशन मेनू पूल करा आणि quick settings पॅनल मधील करंट युझरच्या आयकॉन वर क्लिक करा Add User वर टॅप करा. More Setting मधून फोन कॉलींग इनॅबल करू शकता.तसेच नविन युझर तयार करण्यासाठी Setting --> Users --> Add user.
या नविन युझर साठी स्वतःची होम स्क्रीन आणि सेटींग्ज असतात जे तुमच्या पेक्षा भिन्न असतील. तुम्ही other user mode मध्ये स्वीच करण्याठी नोटीफीकेशन पॅनल मधून हव्या त्या युझरच्या आयकॉनवर टॅप करा. गेस्ट युझर हे किड्स साठी परफेक्ट आहे आणि ते पॅरेंटल कंट्रोलचे देखील काम करते.


8) Pin and unpin the screen:
Pin Appsयाच नावाप्रमाणेच हे वैशिटय स्क्रीन वरील काहीही ठरावीक वेळेसाठी पीन करण्याची परवानगी देते. पीन केल्याने हे अनपीन करेपर्यंत कोणत्याही अपघाती स्वाइप किंवा बटन प्रेस केल्याने यातून बाहेर येणार नाही. स्क्रीन पीनींग हे खुप चांगल्या पध्दतीने कोणत्याही अॅप्स, गेम्स किंवा सेटींग्ज मध्ये काम करते.पीनींग इनॅबल करण्यासाठी Settings -->Security --> Screen Pinning option
Pin an apps-
एखादे अॅप पीन करण्यासाठी हे अॅप सुरू करावे आणि नंतर Overview button म्हणजेच multitask button टॅप करावे आणि हे अॅप व्हू मध्ये आणावे. येथे या अॅपच्या तळाशी एक अॅरो दिसेल यावर टॅप करून पीन करता येते.


9) Double tap to wake:
प्रत्येक वेळेस स्क्रीन वेकअप करण्यासाठी किंवा डिसप्ले साठी पॉवर बटन प्रेस करू नका, तर फक्त स्क्रीनवर कोठेही डबल टॅप करा. हे फीचर इनॅबल करण्यासाठी Setting --> Display & lights -->  Double-tap to wake.

10) Search in settings:
Search Settingआता अॅण्ड्राइड मध्ये खुप ऑप्शन्स समाविष्ट केल्यामूळे यातील मेनूची यादी लांब आणि कॉम्पेक्स झाली आहे. पण सेटींग मध्ये एखादी गोष्ट शोधण्यासाठी वरील मॅग्नीफाइंग ग्लासवर टॅप करा आणि काय शोधायचे आहे ते टाइप करा.







11) Stop adding new app icons to homescreen:
जर तुम्हाला एखादे अॅप इन्स्टॉल झाल्यानंतर त्याचा आयकॉन होम स्क्रीनवर नको असेल तर Play Store --> Settings -> Add icon to Home screen हा बॉक्स अनचेक करा.
Android Button
12) Set Button Actions:
अॅण्ड्राइड मध्ये दरोरोज काम करत असतांना एक सामान्य युझर सुध्दा खुप कामे करतो जसे एका अॅप मधून दूस-या अॅप मध्ये जाणे, होम सक्रीनवर जाणे, फोन लॉक आणि अनलॉक करणे इ. या सर्व क्रिया Home button, Back button आणि Menu button वर कॉन्फिगर केले जाऊ शकतात. तुम्ही हवी ती अॅक्शन सेट करू शकता उदा. होम बटनाला डबल टॅप करून सरळ मागील अॅप मध्ये जाता येते आणि ही मल्टीटास्कींग करणा-यांसाठी खूप महत्वाची आहे.





मला खात्री आहे वरील अॅण्ड्राइड लॉलीपॉप टिप्स तुम्हाला तुमचा फोन पूर्ण क्षमतेने वापरण्यास मदत करतील.