गणितात अनेक जण कच्चे असतात. आता मात्र अशांसाठी कोणतेही गणित चुटकीसरशी सोडविणारे फोटोमॅथ ऍप सादर करण्यात आले आहे.
मायक्रोब्लिंक या कंपनीने गणित सोडविण्यासाठी तयार केलेले हे ऍप्लीकेशन सध्या ऍपलच्या आयओएस,अँड्रॉईडसाठी आणि विंडोज प्रणालीसाठी
उपलब्ध आहे. फोटोमॅथ ऍपची प्रणाली ही अत्यंत सुलभ अशीच आहे. यात स्मार्टफोनमध्ये असणार्या कॅमेर्याचा उपयोग करण्यात येतो.
स्मार्टफोनधारकाला जे गणित सोडवायचे आहे त्यावर कॅमेरा रोखून ते स्कॅन करण्यात येते. यानंतर क्षणार्धात हे गणित सोडवून त्याचे उत्तर स्क्रीनवर येते. सध्या गणिताच्या बेरीज, वजाबाकीसह प्राथमिक आकडेमोडसह बीजगणितातील किचकट समीकरणेही या ऍप्लीकेशनच्या
मदतीने सोडविण्यात येतात. याच्या पुढील व्हर्शनमध्ये
कोणतेही अवघड गणित सोडविण्याची सुविधा राहणार असल्याची माहिती मायक्रोब्लिंक
कंपनीतर्फे देण्यात आली आहे.