या ब्लॉगवरील सर्व माहिती इन्टरनेट आणि तंत्रस्नेही शिक्षकांच्या मदतीने संकलित करण्यात आली आहे .......

Friday, May 6, 2016

संगणकावर Whatsapp कसे वापरावे ?

Whatsapp  ने एव्हाना आपल्या दैनंदिन जीवनात स्थान मिळवलं आहे. SMS/Phone/Email/Gtalk या सारख्या अनेक सेवांचा वापर थोडा कमी करून त्या ऐवजी Whatsapp वापरणे आपण अधिक पसंत करतो. एवढे दिवस मोबाईल मध्ये विराजमान झालेले Whatsapp हल्लीच संगणकावर देखील अवतरले आहे. त्यामुळे आता सतत मोबाईल मध्ये न पाहता , आपल्या संगणकाच्या स्क्रीनवरही Whatsapp चा आनंद घेता येऊ शकतो. चला तर मग पाहुया, Whatsapp आपल्या संगणकावर कसे वापरायचे ते.

सर्वप्रथम तुमच्या संगणकामध्ये web.whatsapp.com या लिंक वर क्लिक करून , Whatsapp च्या वेबसाईट वर जा. तेथे खालील चित्रात दाखविल्या प्रमाणे एक QR code दिसेल. आणि त्या खाली विविध प्रकारच्या मोबाईल ऑपरेटिंग सिस्टम्स मध्ये Whatsapp Web मध्ये कसे जावे याचा मार्ग (Path) दिसेल.



आपल्या मोबाईल मध्ये Whatsapp मध्ये जा. (चित्रात सांगितलेला मार्ग तेथे जाण्यास मदत करेल) . मोबाईल मध्ये खालील प्रकारे QR code स्कॅन करण्यासाठी सांगितले जाईल.


OK, GOT IT वर क्लिक करा. आणि खालील चित्रात दाखविल्याप्रमाणे वेबसाईट वरील QR code स्कॅन करा.


QR code स्कॅन झाल्यानंतर वेबसाईट मध्ये Whatsapp आपोआप चालू होईल. आता आपण मोबाईल व्यतिरिक्त संगणकावरही Whatsapp वापरू शकता.



टीप -  संगणकावर Whatsapp वापरताना मोबाईलवरही whatsapp चालू राहील आणि मोबाईल सतत इंटरनेटशी जोडला असेल याची काळजी घ्या.