या ब्लॉगवरील सर्व माहिती इन्टरनेट आणि तंत्रस्नेही शिक्षकांच्या मदतीने संकलित करण्यात आली आहे .......

Friday, April 22, 2016

प्रिंटस्क्रिन - [ Printscreen ] - कुठल्याही प्रोग्रामचा फोटो घ्या.

बर्‍याचवेळा कॉम्प्युटरवर एखाद्या प्रोग्राममध्ये काम करताना असे वाटते की जर चालू प्रोग्रामचा अथवा स्क्रिनवर जे काम चालू आहे त्याचा फोटो घेता आला असता तर फार बरे झाले असते.
असे खुप वेळा होते, एखादा खेळ [ Game ] पूर्ण झाल्यावर शेवटचे जिंकल्याचे चित्र, एखाद्या महत्वाच्या प्रोग्रामचा फोटो किंवा काम करत असताना एखादा कॉम्युटरद्वारे दिलेला मेसेज दुसऱ्याला दाखविण्यासाठी त्या त्या वेळेस असे वाटते की त्यावेळच्या त्या कॉम्प्युटरवर दिसणार्‍या प्रोग्रामचा फोटो काढता आला असता तर फार बरे झाले असते.
एखादी कॉम्प्युटरवरची गोष्ट दुसऱ्याला दाखविताना ती जर चित्रामध्ये दाखविता आली तर ती नेहमी चांगलीच वाटते.
कॉम्प्युटरवर चालू प्रोग्रामचा फोटो काढण्यासाठी कि-बोर्ड वरील प्रिंटस्क्रिन [ Printscreen ] हे बटन यावेळी उपयोगी पडते. प्रिंटस्क्रिन बटन एकदा दाबून पेंटब्रश, वर्ड, फोटोशॉप इ. कुठलेही सॉफ्टवेअर चालू करुन त्यामध्ये पेस्ट [ Paste ] म्हणजेच [ Ctrl + V ] हे बटन दाबल्यास आपण प्रिंटस्क्रिन घेतलेल्या जागेचे चित्र त्याच स्थितीमध्ये येते. एखाद्या गोष्टीचा पुरावा ठेवण्यासाठी प्रिंटस्क्रिन हे बटन फार उपयोगी पडते.