http://www.chess.com/play/computer
आम्ही तंत्रस्नेही शिक्षक .....
Wednesday, May 8, 2024
बुद्धिबळातील मोहर्यांच्या चाली
बुद्धिबळाचा प्रत्येक मोहरा विशिष्ट पद्धतीने चाली करतो.
- राजा उभ्या, आडव्या आणि तिरप्या दिशेने एक घर जाऊ शकतो. प्रत्येक डावात राजा फक्त एकदाच एक विशेष चाल "किल्लेकोट" करू शकतो. किल्लेकोटामध्ये राजा दोन घरे हत्तीच्या दिशेने जातो आणि हत्ती राजाला लागून राजाच्या पलीकडे सरकतो. जर
- राजा किंवा किल्लेकोटात सहभागी असलेला हत्ती यापूर्वी या डावात कधीच हाललेला नसेल,
- राजा आणि हत्तीमध्ये कुठलाही मोहरा नसेल,
- राजाला शहाच्या धाकाखाली नसेल, किल्लेकोट करताना राजा ज्या घरांतून सरकतो त्यावर विरोधी मोहर्यांचा रोख नसेल आणि किल्लेकोट झाल्यानंतर राजा शहाच्या धाकाखाली येणार नसेल, तरच किल्लेकोट करता येतो.
किल्लेकोट झाल्यावर राजाला शह देणे अवघड होते.
- हत्ती आडव्या किंवा उभ्या दिशेने कितीही रिकामी घरे जाऊ शकतो.
- उंट तिरप्या दिशेने कितीही रिकामी घरे जाऊ शकतो. तिरपी घरे एकाच रंगाची असल्याने मूळ पांढर्या घरातला उंट पांढर्या व दुसरा नेहमी काळ्या घरातूनच हिंडतो. प्रत्येक खेळाडूच्या दोन उंटांपैकी एक पांढर्या तर दुसरा काळ्या घरात असतो.
- वझीर आडव्या, उभ्या किंवा तिरप्या दिशेने कितीही रिकामी घरे जाऊ शकतो.
- घोडा रिकाम्या किंवा भरलेल्या घरांवरून उड्या मारू शकतो. तो दोन घरे आडव्या दिशेने आणि एक घर उभ्या दिशेने किंवा दोन घरे उभ्या दिशेने आणि एक घर आडव्या दिशेने जातो. याला अडीच घरांची चाल असेही म्हटले जाते. प्रत्येक चालीनंतर घोड्याच्या घराचा रंग बदलतो.
- प्यादयांच्या चाली सर्वात गुंतागुंतीच्या आहेत:
- प्यादे एक घर पुढे रिकाम्या घरात सरकू शकते. जर प्याद्याची पहिलीच चाल असेल तर ते दोन रिकाम्या घरातून जाऊ शकते. प्यादे मागे जाऊ शकत नाही.
- जर प्याद्याने पहिली दोन घरांची चाल केली आणि त्याच्या शेजारील घरात जर विरोधी प्यादे असेल तर विरोधी प्यादे "एन पासंट" वापरून पहिले प्यादे मारू शकते. ही चाल जणू पहिले प्यादे एकच घर चालले असे मानून होते. हे फक्त दोन घरांच्या चालीनंतरच्या पहिल्या चालीवरच शक्य आहे.
- प्यादे फक्त विरोधी मोहरा मारण्यासाठीच एक घर तिरपी चाल करते. अन्यथा ते सरळ पुढे रिकाम्या घरात जाते. तिरपे घर रिकामे असले तरी तेथे जाऊ शकत नाही.
- जर प्यादे सरकत शेवटाच्या पंक्तीत पोचले तर त्याला बढती मिळून खेळाडूच्या इच्छेनुसार ते वझीर, हत्ती, उंट किंवा घोडा बनू शकते. साधारणपणे खेळाडू वझीर करणे पसंत करता
घोडा सोडून कोणताही मोहरा दुसर्याला ओलांडून पलीकडे उडी मारू शकत नाही. स्वत:च्या मोह्र्यांना मारता येत नाही. फक्त विरोधी मोहर्यांनाच मारता येते. ज्यावेळी एखादा मोहरा मारला जातो त्यावेळी मारेकरी मोहरा त्याची जागा घेतो. ( याला "एन पासंट" चा अपवाद आहे.) मेलेला मोहरा डावातून बाद होतो. प्याद्याला बढती मिळाल्यानंतर तो नवीन मोहरा म्हणून वापरला जातो. पण बढती मिळाल्यावर मेलेलाच मोहरा घ्यावा अशी अट नाही. राजा मारला जाऊ शकत नाही त्याला अंतिम शह देता येतो. राजाला शहातून बाहेर काढता येत नसल्यास मात झाली असे समजून खेळाडू हरतो.
बुद्धिबळाचा डाव 'शह देऊन मात करणे या शिवाय अजूनही काही प्रकारे संपू शकतो --- पटावर वाईट परिस्थिती असल्यास खेळाडू राजीनामा देतो हार मान्य करतो. किंवा डाव अनिर्णित राहू शकतो.
बुद्धिबळ परिचय
बुद्धिबळ (इंग्लिशमध्ये चेस व हिंदीमध्ये शतरंज) हा दोन खेळाडूंनी एका तक्त्यासारख्या पटाच्या दोन्ही बाजूला बसून खेळावयाचा बैठा खेळ आहे. बुद्धिबळाची सुरुवात भारतातून झाली.साहित्यामध्ये बुद्धिबळाचा पहिला संदर्भ इ.स. पूर्व ५०० मध्ये भारतात दिघ निकय मध्ये ब्रह्मजल सुत्त या ग्रंथात आढळतो. बुद्धिबळासाठी विविध भाषांत वापरले जाणारे शब्द भारतीय चतुरंग या शब्दापासून तयार झाले आहेत यावरून हे स्पष्ट होते. चतुरंग म्हणजे "सैन्याची चार अंगे" पायदळ, घोडदळ, हत्ती आणि रथ. तसेच प्राचीन काळात फक्त भारतातच सैन्यांमध्ये घोडे, उंट आणि हत्ती हे तीनही प्राणी वापरले जात होते.शतरंजमधील मोहर्यांच्या चाली मर्यादित होत्या. सध्याचा उंट (ज्याला पूर्वी हत्ती म्हटले जायचे) त्याकाळी फक्त तिरपी दोन घरे उडी मारू शकत असे. मंत्री (म्हणजे सध्याचा वझीर) फक्त तिरपे एक घर जाऊ शकत असे; प्यादी सुरुवातीला दोन घरे जाऊ शकत नव्हती, आणि किल्लेकोटाची संकल्पनाच नव्हती. प्याद्यांना बढती मिळून फक्त मंत्री होता येत असे.इ.स. १२०० च्या दरम्यान दक्षिण युरोपमध्ये नियम बदलण्यास सुरुवात झाली आणि १४७५ च्या आसपास काही महत्त्वाचे बदल केले गेले.प्याद्यांना पहिली २ घरांची चाल मिळाली आणि त्यातूनच एन पासंट सुरू झाले. उंट आणि वझीर यांना आज वापरल्या जाणार्या चाली मिळाल्या. त्यामुळेच वझीर सर्वात महत्त्वाचा मोहरा ठरला. या बुद्धिबळाला "वझिराचे(राणीचे) बुद्धिबळ" संबोधले जाऊ लागले. आज आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळले जाणारे बुद्धिबळ हे पाश्चिमात्य बुद्धिबळ म्हणून ओळखले जाते.
बुद्धिबळ सध्या जगातील सर्वात प्रसिद्ध खेळांपैकी एक आहे. जगभरात अदमासे ६० कोटी हौशी किंवा व्यावसायिक लोक क्लब्जमध्ये, पत्राने, आंतरजालावर व विविध स्पर्धांमधून बुद्धिबळ खेळतात. बुद्धिबळात कला आणि शास्त्र यांचा मिलाप झालेला दिसतो.बुद्धिबळ एका चौरस पटावर खेळला जातो. या ८x८ च्या पटावर ६४ घरे असतात व ती आलटून पालटून क्रमाने काळ्या-पांढर्या रंगाची असतात. पहिला खेळाडू पांढर्या तर दुसरा काळ्या सोंगट्यांनी खेळतो. या सोंगट्यांना मोहरे म्हणतात. प्रत्येक खेळाडूचे एका रंगाचे सोळा मोहरे असतात.:- एक राजा, एक वजीर(राणी), दोन हत्ती(रुक), दोन घोडे(सरदार, नाइट), दोन उंट(बिशप) आणि आठ प्यादी(पॉन). प्रतिस्पर्ध्याच्या राजाला शह, म्हणजे मृत्यूचा धाक देऊन मात करणे(हरवणे) हा खेळाचा उद्देश असतो. राजाला शह मिळाल्यानंतर कुठलीही खेळी करून जेव्हा त्याला शहातून बाहेर पडता येत नाही त्यावेळी राजावर मात झाली असे मानले जाते. विचारवंतांनी बराच अभ्यास करून मात करण्यासाठी विविध क्रमांच्या चालींच्या खेळी रचल्या आहेत.
बुद्धिबळ एका ८ स्तंभ आणि ८ ओळींच्या चौरसाकृती पटावर खेळला जातो. स्तंभांना इंग्लिश a पासून h पर्यंत तर पंक्तींना १ ते ८ अशी नावे असतात. ६४ चौरसांचे रंग काळे-पांढरे असतात. सोंगट्या एकसारख्या काळ्या आणि पांढर्या अशा दोन संचात विभागलेल्या असतात. प्रत्येक संचात १६ मोहरे असतात. १ राजा, १ वझीर, २ उंट, २ घोडे, २ हत्ती आणि ८ प्यादी.
खेळाडू काळा किंवा पांढरा संच नाणेफेक करून निवडतात किंवा स्पर्धेच्या नियमानुसार कुणी कुठला संच घेऊन खेळायचे ते ठरते. प्रत्येक खेळाडूच्या उजव्या हाताच्या कोपर्यात पांढरा चौरस येईल अशा पद्धतीने पट मांडला जातो. काळ्या संचातील वझीर काळ्या घरात तर पांढरा वझीर पांढर्या घरात असतो.
पांढरा पहिली चाल करतो. नंतर प्रत्येक खेळाडू स्वत:चे मोहरे वापरून एकानंतर एक चाली करतात. मोहरे रिकाम्या घरात किंवा प्रतिस्पर्ध्याच्या मोहर्याला मारून त्याच्या घरात ठेवता येतात. मेलेला मोहरा डावाबाहेर काढला जातो.
जर राजाला विरोधी मोहरा एका खेळीत मारू शकत असेल तर राजाला शह मिळाला असे म्हटले जाते. खेळाडू स्वत:च्या राजास शह बसेल अशी कोणतीही चाल खेळू शकत नाही तसेच स्वत:च्या राजास शह बसेल अशी कोणतीही चाल प्रतिस्पर्धी खेळाडूला शक्यतो करू देत नाही. इतके करून जर एखाद्या खेळाडूच्या राजाला शह मिळालाच तर त्याला राजाला एका खेळीत शहातून बाहेर काढणारी चाल करावी लागते. जर अशी चाल खेळता येत नसेल तर त्या खेळाडूची हार झाली असे मानले जाते. प्रत्येक खेळाडू दुसर्याचा राजावर मात करून त्याला हरवण्यासाठी चिकाटीने खेळतो. जो पहिल्य़ांदा यशस्वी होतो तो जिकला.
छोटी वाक्ये (इंग्रजी-मराठी)
छोटी वाक्ये (इंग्रजी-मराठी)
English | मराठी |
It is an elephant | तो हत्ती आहे. |
I salute the sun | मी सूर्याला नमस्कार करतो. |
I run fast | मी वेगात पळतो. |
I play in the evening | मी संध्याकाळी खेळतो. |
I read a lesson | मी धडा वाचतो. |
I write a letter | मी पत्र लिहितो. |
We salute god | आम्ही देवाला वंदन करतो. |
We go to a village | आम्ही गावाला जातो. |
We see Criket | आम्ही क्रिकेटचा खेळ पाहतो. |
We do not laugh loudly | आम्ही जोराने हसत नाही. |
We stay here | आम्ही येथे राहतो. |
You draw a picture | तू चित्र काढतोस. |
You laugh loudly | तू जोराने हसतोस. |
You do not run | तू पळत नाहीस. |
You walk fast | तू वेगाने चालतोस. |
You sing good song | तू चित्र काढतोस. |
You all see television | तुम्ही जण दूरदर्शन पाहता. |
You all enter the house | तुम्ही जण घरात प्रवेश करता. |
You all read lessons | तुम्ही जण धडे वाचता. |
You play with a ball | तुम्ही जण चेंडू खेळता. |
You all salute the school | तुम्ही जण शालामातेला नमस्कार करता. |
He runs fast | तो वेगात चालतो. |
He does not drink milk | तो दूध पीत नाही. |
He drinks water | तो पाणी पितो. |
He salutes the god | तो देवाला नमस्कार करतो. |
He goes to a garden | तो बागेत जातो. |
He sees a book | तो पुस्तक पाहतो. |
They come here | ती येथे येतात. |
They eat fruits | ती फळे खातात. |
They salute the sun | ती सूर्याला नमस्कार करतात. |
They read lesson | ती धडा वाचतात. |
They see a dance | ती नाच पाहतात. |
She drinks milk | ती दूध पिते. |
She does not go to school | ती शाळेत जात नाही. |
She draws a picture at home | ती घरी चित्र काढते. |
She sings a song | ती गाणे म्हणते. |
She does not play with a b | ती चेंडूने खेळत नाही. |
They go to school | त्या शाळेत जातात. |
They salute the national flag | त्या राष्ट्रध्वजाला नमस्कार करतात. |
They sing the national anthem | त्या राष्ट्रगीत म्हणतात. |
They draw pictures | त्या चित्रे काढतात. |
They see flowers | त्या फुले पाहतात. |
That is a book | ते पुस्तक आहे. |
That song is sweet | ते गाणे गोड आहे. |
That garden is beautiful | ती बाग सुंदर आहे. |
That house is big | ते घर मोठे आहे. |
Where is that picture | ते चित्र कोठे आहे ? |
Those leaves are gtreen | ती पाने हिरवी आहेत. |
Those songs are sweet | ती गाणी गोड आहेत. |
Those gardens are beautiful | त्या बागा सुंदर आहेत. |
Those houses are big | ती घरे मोठी आहेत. |
Where are those pictures | ती चित्रे कोठे आहेत ? |