वेबब्राउजर्सचे ‘बाहुबली’एखाद्या गोष्टीची उपयुक्तता वाढवण्यासाठी
त्यामध्ये वेळोवेळी काही बदल केले जातात. ‘ट्रान्सफॉर्मर’ सिनेमातला
ऑप्टिमस प्राइम माहित्येय का? तर या सिनेमाच्या दुसऱ्या भागात ऑप्टिमसला
ताकदवान आणि अधिक सुसज्ज बनवण्यासाठी दुसरा एक रोबोट त्याला आपले पार्ट्स
देतो. प्राइम अधिक चांगल्या प्रकारे प्रतिकार वगैरे करू लागतो. हे
सिनेमाच्या बाबतीत झालं. माणसाचेच उदाहरण द्यायचे झाले तर स्वत:ची
उपयुक्तता वाढवण्यासाठी विविध कौशल्य अंगीकारणे महत्त्वाचे ठरते. प्रत्येक
टप्प्यावर तो तसे करत असतो. ‘वेबब्राउजर्स’च्या बाबतीत त्यांची उपयुक्तता
वाढवण्यासाठी ‘प्लग इन्स’ असतात. ही प्लग इन्सच कुठल्याही ब्राउजरला एक
वाढीव वैशिष्टय़ प्राप्त करून देतात.
कुठलाही वेबब्राउजर डाउनलोड केला की त्यामध्ये काही फीचर्स बाय डिफॉल्ट असतात. त्यानुसार त्याचं कामकाज सुरू असतं. ‘प्लग इन’ म्हणजे असं सॉफ्टवेअर ज्यामुळे एखाद्या प्रोग्रामला किंवा अॅप्लिकेशनला वाढीव गोष्टी, प्रोग्राम्स चालवता येतात. उदाहरणार्थ ‘अॅडोब फ्लॅश प्लेअर’. या ‘प्लग इन’चं नोटिफिकेशन आपण अनेकदा पाहिलेलं आहे. फ्लॅश प्लेअर नसेल तर व्हिडीओ असणाऱ्या वेबसाइट्सवरचे व्हिडीओ दिसत नाहीत. त्यामुळेच वेबब्राउजर डाउनलोड केला की बहुतांश वेळा फ्लॅश प्लेअरचा प्लग इन इन्स्टॉल करण्याची परवानगी लगेचच मागितली जाते. इंटरनेटवर सध्याच्या घडीला अनेक प्लग इन्स उपलब्ध आहेत. सोशल मीडिया नेटवर्किंगसाठी, परदेशी भाषा शिकण्यासाठी किंवा त्यातली मुळाक्षरे टाइप करण्यासाठी, इमेल्सच्या सुरक्षेसाठी प्रेटी गुड प्रायव्हसी किंवा पीजीपी हा प्लग इन लोकप्रिय आहे. इतकेच नाही तर मायक्रोसॉफ्ट ऑफिसची डॉक्युमेंट्स ब्राउजरमध्येच पाहता यावीत यासाठीही काही प्लग इन्स उपलब्ध आहेत.
मुळातच प्लग इन्स हे अॅप्लिकेशन किंवा वेबब्राउजरसोबतच काम करतं. प्लग इन स्वतंत्रपणे एकटय़ाने असे काम करू शकत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे हे प्लग इन्स किंवा छोटे छोटे प्रोग्राम्स हे कुठलाही डेव्हलपर लिहू शकतो. त्यामुळे अॅप्लिकेशन्स जशी बाजारात येतात तशी त्यांना पूरक असे प्लग इन्स किंवा अॅडऑन्सही तयार होतात.
२. अॅडऑन्स नावाचा ऑप्शन त्यामध्ये दिसेल, त्यावर क्लिक करा.
३. त्यामध्ये प्लग इन्स, अॅडऑन्स, एक्स्टेन्शन, युजर स्क्रिप्ट, अपिअरन्स, सव्र्हिसेस असे पर्याय असतात.
४. त्यामधील प्लग इन्स किंवा अॅडऑन्सवर क्लिक करा.
५. आपल्याला हव्या असणाऱ्या प्लग इनबाबत सर्च करा आणि ते इन्स्टॉल करा.
मीडिया प्लेअर्स : विविध प्रकारचे व्हिडीओज चालवण्यासाठी तसेच फॉरमॅट्सना सपोर्ट करण्यासाठी विनअॅम्प, जीस्ट्रीमरसारखे प्लग इन्स वापरले जातात.
इमेल्स : वर सांगितल्याप्रमाणे इमेलच्या सिक्युरिटीसाठी प्रेटी गुड प्रायव्हसी हे प्लग इन मोठय़ा प्रमाणावर वापरले जाते.
वेबब्राउजर : ब्राउजर्सच्या संदर्भात एक्स्टेन्शन्स वापरली जातात जी ब्राउजरची उपयुक्तता वाढवतात. अॅडोब फ्लॅश प्लेअर, क्विकटाइम, मायक्रोसॉफ्ट सिल्वरलाइट ही त्याची काही उदाहरणं आहेत.

- प्लग इनची गरज आहे का?
- प्लग इन्स कसे अॅड करायचे?
२. अॅडऑन्स नावाचा ऑप्शन त्यामध्ये दिसेल, त्यावर क्लिक करा.
३. त्यामध्ये प्लग इन्स, अॅडऑन्स, एक्स्टेन्शन, युजर स्क्रिप्ट, अपिअरन्स, सव्र्हिसेस असे पर्याय असतात.
४. त्यामधील प्लग इन्स किंवा अॅडऑन्सवर क्लिक करा.
५. आपल्याला हव्या असणाऱ्या प्लग इनबाबत सर्च करा आणि ते इन्स्टॉल करा.
- अॅडऑन आणि प्लग इनमधील फरक
- धोका काय?
- प्लग इन्सचे प्रकार