आता वेळ आहे कि बोर्ड शार्टकटस चा वापर करुन काही वेळ गंमत करण्याची. कि बोर्ड शॉर्टकट हे कॉम्प्युटरवर काम करीत असतांना उ
त्पादत क्षमता वाढविण्याचे काम करतात. अर्थात, प्रत्येक कॉम्प्युटर युझरला आवश्यक असलेले कि बोर्ड शॉर्टकट माहित असलेच पाहिजे. कॉम्प्युटरवरील काम अधिक कार्यक्षमतेने आणि वेगाने करण्याव्यतीरीक्त, माऊसचा वापर न करता अनेक कामे करुन तुम्ही तुमचे मित्र किंवा सहका-यांवर छाप पाडू शकता.

Browser:
Ctrl+W: जर तुम्हाला वेब ब्राऊझर मधील टॅब बंद करावयाचा असेल तर या कि प्रेस कराव्यात. या किज चा उपयोग अनेक प्रोग्रॅम मध्ये सुध्दा होतो.
Ctrl+Shift+T: जर तुम्ही चुकून ब्राउझर मधील एखादा टॅब चुकून बंद केला असेल आणि तुम्हाला तो पुन्हा हवा असेल तर या कि प्रेस करा. (मॅक साठी Cmd+Z)
Ctrl+PageUp/PageDown: ब्राउझर मध्ये एका टॅब मधून दुस-या टॅबवर जलद गतीने जाण्यासाठी या कि वापराव्यात.
File and Folder:
Shift + CTRL + N: विंडोज 7 मध्ये एखादे फोल्डर तयार करणे खुप सोपे आहे. फक्त जेथे फोल्डर तयार करावयाचे आहे तेथे Shift + Ctrl + N या कि प्रेस कराव्यात. आता तुम्हाला New folder नावाचे एक फोल्डर तयार झालेले दिसेल.
F2: सिलेक्ट केलेल्या फाईल किंवा फोल्डरचे नाव जलद गतीने बदलवण्यासाठी F2 कि प्रेस करावी.
F3: हि कि प्रेस केली तर एक्सप्लोररची विंडो आणि त्यातील सर्च बार ओपन होईल. तर एक्सप्लोरर आधिच ओपन असेल तर यात फक्त सर्च बार ओपन होईल.
Alt+F4: चालू असलेला प्रोग्रॅम बंद होईल.
Ctrl+W: सध्या चालू असलेली विंडो किंवा टॅब बंद करण्यासाठी या किचा वापर करावा.
Magnifier
Windows + [+] OR Windows + [-] : स्क्रीन झूम इन किंवा झूम आऊट करण्यासाठी या कि ने विंडोज मॅग्नीफायर कार्यांन्वीत होतो.
Windows + Esc : मॅग्नीफायर मधून बाहेर पडण्यासाठी हि कि प्रेस करावी.
Amazing Windows key:
Windows + M: चालू असलेल्या सर्व विंडो ताबडतोब टाक्सबार वर मिनिमाईज केल्या जातात. अचानक आलेल्या ति-हाइत व्यक्तीपासुन तुम्ही करीत असलेले काम लपविण्यासाठी या कि चा वापर होऊ शकतो. जेव्हा तुम्हाला या सर्व विंडो परत हव्या असतील तेव्हा Windows + Shift + M कि प्रस करावी आणि तुमच्या समोर पुर्वी प्रमाणे सर्व विंडो आलेल्या दिसतील.
Windows + Home: सध्या चालू असलेला प्रोग्रॅम सोडून इतर सर्व विंडोज मिनिमाइज केल्या जातात.
Windows + L: कॉम्प्युटरला ताबडतोब लॉक केले जाते.
Windows + Tab: याला Aero Flip 3D असे म्हणतात. या कि चा वापर करुन तुम्ही जलद गतीने ओपन असलेल्या सर्व विंडोंचा प्रिव्हू दिसतो. येथे ओपन असलेल्या सर्व विंडोंचा ढिग दिसतो.
Windows + Pause: Systems Properties या डायलॉग बॉक्स जलद गतीने ओपन करण्यासाठी हि कि प्रेस करावी.
Windows + T: टास्क बार वरील एका प्रोग्रॅम मधून दुस-या प्रोग्रॅम मध्ये जाता येते.
Windows + Up/Down: चालू असलेली विंडो maximizes आणि restores करता येते.
सौजन्य : itvishwa.com
सौजन्य : itvishwa.com