या ब्लॉगवरील सर्व माहिती इन्टरनेट आणि तंत्रस्नेही शिक्षकांच्या मदतीने संकलित करण्यात आली आहे .......

Thursday, June 9, 2016

व्हाटसअॅपला मटेरियल डिझाईन


काही दिवसांपुर्वीच व्हाटसअॅपला मटेरियल डिझाईन मिळणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. प्रारंभी निवडक वापरकर्त्यांना ते मिळाले होते. आता मात्र व्हाटसअॅपच्या .१२.८४ या लेटेस्ट अपडेटच्या माध्यमातून सर्व वापरकर्त्यांना मटेरियल डिझाईन देण्यात आले आहे. यात इंटरफेस आधीसारखाच ठेवण्यात आला असला तरी आयकॉन, इमोजी आदी अत्यंत आकर्षक करण्यात आलेले आहेत. विशेषत: आयकॉन्सचा आकार मोठा आकर्षक करण्यात आला आहे. यात ऍनिमेशन अटॅच करता येणे शक्य आहे. याशिवाय वरील बाजूस एकाच बारखाली कॉल्स, कॉन्टॅक्ट आणि चॅट आदींना स्थान देण्यात आले आहे. व्हाटसऍपच्या वापरकर्त्याचा प्रोफाईल फोटो मोठा करण्यात आला आहे.

व्हाटसअॅपला नवीन अपडेशनमध्ये या सर्व बाबी देण्यात आल्या आहेत. सध्या अँड्रॉईडवर हे अपडेट असून लवकरच आयओएस आणि अन्य प्रणालींवर सादर करण्यात येणार आहे.