दैनंदिन जीवनातील तणाव व नैराश्य दुर सारून आनंदी जीवन जगण्याची कला शिकवण्यासाठी ‘सीबीटी’ नावाचे अनोखे ऍप उपलब्ध करण्यात आले आहे.
आधुनिक युगाचा सर्वाधीक ‘साईड इफेक्ट’ म्हणजे तणाव होय. दीर्घ काळापासूनच्या तणावाचे कधी नैराश्यात रूपांतर होते हे कुणाला समजतच नाही. जगभरात सुमारे ३५ कोटी लोक नैराश्याने ग्रासल्याचे मानले जात आहे. नैराश्याची परिणिती ही व्यवसाधिनता वा आत्महत्येमध्ये होत असते. यामुळे तणाव दुर करण्यासाठी अनेक प्रकारच्या उपाययोजना करण्यात येतात. यात सर्वाधीक उपयुक्त ‘कोग्निटिव्ह बिहेवियरल थेरपी’ अर्थात ‘सीबीटी’ असल्याचे सिध्द झाले आहे. या मानसोपचार प्रणालीवर आधारित ‘सीबीटी’ नावाचे ऍप आता तयार करण्यात आले आहे.
अँड्रॉईड आणि आयओएसवर सादर करण्यात आलेले हे ऍप औदासिन्य आणि मनातील नकारात्मक विचार दुर करण्यासाठी मदत करते. एखाद्या मानसशास्त्रज्ञाप्रमाणे ते ऍप डाऊनलोड करणार्याची काळजी घेते. विशेष बाब म्हणजे यात आत्महत्याविरोधी हेल्पलाईनशी थेट संपर्काचीही व्यवस्था करण्यात आली आहे. याच्या मदतीने कुणी अगदी आत्महत्या करण्याच्या विचारात असला तरी तो त्यापासून परावृत्त होऊ शकतो. हे ऍप तसे मोफत असले तरी याचे ‘प्रो व्हर्शन’ १.९९ डॉलर्सला उपलब्ध आहे. यात जाहीराती नसून अन्य काही उपयुक्त सुविधादेखील देण्यात आल्या आहेत.
by: shekhar patil
by: shekhar patil