संगणकामध्ये टाईप केलेला किंवा इंटरनेटवर शोधलेला मजकूर आपल्याला कागदावर उतरवायचा असेल तर आपण प्रिंटरच्या साहाय्याने त्याची प्रिंट काढतो आणि क्षणार्धात संगणकाच्या स्क्रीनवर दिसणारा मजकूर आपल्याला कागदावर मिळतो. तसेच प्रिंटरने आपण आपल्या आवडत्या कॉफी मगवर किंवा टी-शर्टवर आपलं नाव किंवा एखादं मजेशीर वाक्य, संदेश छापू शकतो.
त्यामुळे आपल्या सर्वाना प्रिंटर हा चांगलाच परिचयाचा झाला आहे. अनेक माणसे ऑफिसची कामे घरी आणून करतात त्यामुळे घरीही प्रिंटरची गरज भासते. तसेच मुलांच्या शालेय प्रोजेक्टसाठीही प्रिंटर उपयोगी पडतो, म्हणून प्रिंटर सध्या घरोघरी दिसत आहेत. मात्र प्रिंटरची पारंपरिक, आपल्या डोक्यात घट्ट बसलेली व्याख्या थ्रीडी प्रिंटरच्या आगमनाने बदलली आहे. कारण या प्रिंटरमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तूही आपण प्रिंटरमध्ये बनवू शकतो.
भारतामध्ये ही संकल्पना व्यावसायिकरित्या अजून इतकी रुजलेली नसली तरी परदेशात मात्र थ्रीडी प्रिंटरच्या वापराला सुरुवात झालेली आहे. थ्रीडी प्रिंटर म्हणजे नेमकं काय? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. एरवी तुम्ही प्रिंटरने कागदावर, शर्टवर प्रिंट काढता; पण थ्रीडी प्रिंटर हा तुम्हाला कोणत्याही प्रकारची वस्तूची प्रिंट काढून देऊ शकतो. म्हणजेच थ्रीडी प्रिंटर तुम्हाला एखादी वस्तू जशीच्या तशी बनवून देऊ शकतो. मग ही वस्तू थ्रीडी प्रिंटरमध्ये कशी प्रिंट केली जाते, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल.
थ्रीडी प्रिंटरमध्ये कशा प्रकारे प्रिंट होते..
आपल्याला ज्या वस्तूचं प्रिंट काढायचं आहे, त्या वस्तूचं एक व्हच्र्युअल डिझाईन, थ्रीडी मॉडेलिंग प्रोग्रामच्या सी.ए.डी. फाईलमध्ये असणं गरजेचं आहे. जर हे व्हच्र्युअल डिझाईन आपल्याकडे असेल तर आपण थ्रीडी प्रिंटरमध्ये त्या डिझाईनच्या साहाय्याने वस्तू तयार करू शकतो. म्हणजेच थ्रीडी प्रिंटरमध्ये प्रिंट काढू शकतो.
आपल्याला ज्या वस्तूचं प्रिंट काढायचं आहे, त्या वस्तूचं एक व्हच्र्युअल डिझाईन, थ्रीडी मॉडेलिंग प्रोग्रामच्या सी.ए.डी. फाईलमध्ये असणं गरजेचं आहे. जर हे व्हच्र्युअल डिझाईन आपल्याकडे असेल तर आपण थ्रीडी प्रिंटरमध्ये त्या डिझाईनच्या साहाय्याने वस्तू तयार करू शकतो. म्हणजेच थ्रीडी प्रिंटरमध्ये प्रिंट काढू शकतो.
तसेच, आपल्याकडे ती वस्तू उपलब्ध असेल आणि तशीच हुबेहूब दिसणारी दुसरी वस्तू आपल्याला उत्पादन करायची असेल तर आपण आपल्याकडे उपलब्ध असलेल्या वस्तूचं अगोदर थ्रीडी स्कॅनरने स्कॅन करून, त्या वस्तूची थ्रीडी डिजिटल कॉपी बनवून सहजरित्या त्या कॉपीची प्रिंट काढू शकतो. थ्रीडी स्कॅनर वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा वापर करून थ्रीडी मॉडेल तयार करतो.
व्हर्च्युअल डिझाईन तयार झाल्यावर त्याची माहिती ‘स्लाईस’ या सॉफ्टवेअरद्वारे थ्रीडी प्रिंटरला पुरवली जाते. स्लाईस हे थ्रीडी मॉडेलिंग सॉफ्टवेअर आहे. स्लाईस सॉफ्टवेअरद्वारे डिझाईन आडव्या पद्धतीत अनेक लहान-लहान भागांत विभागले जाते. त्यानंतर स्लाईस ती फाईल थ्रीडी प्रिंटरमध्ये अपलोड करतो. त्यानंतर थ्रीडी प्रिंटर थरावर थर चढवत त्या डिझाईनचं प्रिंट काढण्यास सुरुवात करतो आणि या प्रकारे थ्रीडी प्रिंटरमध्ये वस्तू प्रिंट होते. पण सर्वच थ्रीडी प्रिंटर एकाच तंत्रज्ञानाचा वापर करून प्रिंट करत नाही.
थ्रीडी प्रिंटर वेगवेगळ्या पद्धतीचा वापर करून प्रिंट केली जाते. प्रिंटिंगची प्रक्रिया ही मात्र जवळ-जवळ सारखी असते. फक्त थ्रीडी प्रिंटरमध्ये वस्तू प्रिंट होण्याची पद्धत वेगवेगळ्या असतात. समजा, आपल्याला प्लास्टिकपासून एखादी वस्तू निर्माण करायची आहे. म्हणजेच थ्रीडी प्रिंटरमध्ये प्लास्टिकपासून प्रिंट काढायची आहे. तर अशा वेळी कधी प्लास्टिकला वितळवून किंवा मृदू करून त्याची प्रिंट काढली जाते.
म्हणजेच आपण जे काही मटेरिअल वापरू त्या मटेरिअलला वितळवून, मऊ करून किंवा अन्य प्रकारे प्रक्रिया करून प्रिंट काढली जाते. मटेरिअल जेटिंग, बायंडर जेटिंग, मटेरिअल एक्सट्रिशन, पावडर बेड फ्युजन, शीट लॅमिनेशन या तंत्रज्ञानाचा वापर करून थ्रीडी प्रिंटरमध्ये प्रिंट केली जाते.
सुरुवातीच्या काळात फक्त नमुना वस्तूंचे प्रिंट थ्रीडी प्रिंटरमध्ये काढले जायचे; पण त्यानंतर मात्र तंत्रज्ञानात भर पडली आणि आता आपण दैनंदिन वापरू शकतो अशा वस्तूचं प्रिंट थ्रीडी प्रिंटरमधून काढू शकतो. या थ्रीडी प्रिंटरची किंमत ही आपण वापरतो त्या प्रिंटरपेक्षा जास्त असते. अनेक प्रकारचे थ्रीडी प्रिंटर आहेत आणि त्याचा वेगवेगळ्या प्रकारच्या मॉडेलचं प्रिंट काढण्यास वापर होतो. त्यानुसार थ्रीडी प्रिंटरची किंमत अवलंबून असते.
तंत्रज्ञानात झपाटय़ाने विकास होत असल्यामुळे थ्रीडी प्रिंटरमध्ये भविष्यात आणखी सुधारणा होतील. थ्रीडी प्रिंटरचा प्रसार भारतात सध्या होत आहे. एखाद्या वस्तूची प्रतिकृती बनवणं यात सहज शक्य असल्यामुळे थ्रीडी प्रिंटरचा वापर जास्तीत जास्त क्षेत्रात होण्याची शक्यता आहे.
prahar