आज देशभरातील सर्वात जास्त व्यक्ती अँड्रॉइड मोबाईल वापरतात. पण, तरी आपल्याला या फोन्सची काही महत्त्वाची फीचर्स माहित नसतात. या अँड्रॉइडमध्ये काही खास शॉर्टकट्स असतात जे तुम्हालाही माहीत नसतील. पण, ते तुम्ही जाणून घेणं गरजेचं आहे.
१. बायपास अनलॉकिंग
या फीचरमुळे तुमच्या फोनला माहीत असेल की केव्हा अनलॉक होणं सुरक्षित आहे. एकदा का तुम्ही त्यात विश्वसनीय स्थान किंवा आवाज स्टोअर केला की तुमचा फोन कोणत्याही पासवर्डशिवाय अथवा पॅटर्नशिवाय अनलॉक होऊ शकतो.

२. इन्स्ट कॉल रिजेक्शन
तुमचा फोन हा कॉलरला आपोआप सांगू शकतो की तुम्ही व्यस्त असल्याने त्यांचा कॉल उचलू शकत नाही. त्यासाठी तुम्ही सेटिंगमध्ये जाऊन कॉल या पर्यायावर जा. तिथे 'सेट रिजेक्ट मेसेज, क्रिएट आणि तुम्हाला हवा असलेला टेक्स्ट लिहून ठेवा. जर तुम्हाला आलेला कॉल रिजेक्ट करायचा असेल तर तुम्ही तो मेसेज वापरू शकता

३. ओके गूगल
अँड्रॉइड यूजर्स त्यांच्या फोनमध्ये असलेल्या ओके गूगल या जबरदस्त फीचरचा वापर प्रत्यक्षात फार कमी करतात. गूगलवर काही शोधायचे असल्यास केवळ ओके गूगल म्हणून काहीही टाईप केल्याशिवाय शोधता येते.

४. कॉन्टॅक्ट विजेट
ज्या व्यक्तींना तुम्ही सर्वात जास्त कॉल करता त्यांच्या नंबरचा विजेट तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर सेव्ह करा. म्हणजे तुम्हाला दरवेळी तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये जाण्याची गरज भासणार नाही.

५. कॅमेरा
कधीकधी तातडीने एखादा फोटो काढण्यासाठी तुम्हाला पटकन कॅमेरा सुरू करण्याची गरज भासते. त्यासाठी तुमचा फोन लॉक असतानाही स्क्रीनच्या डाव्या कोपऱ्यात खालच्या बाजूला एक कॅमेरा आयकॉन असतो. तो तुम्ही घाईघाईत वापरू शकतात.